वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Mobile Recharge दूरसंचार नियामक ट्रायने ग्राहकांच्या हितासाठी मोठे पाऊल उचलत ‘दूरसंचार ग्राहक संरक्षण नियम, २०२६’ चा नवीन मसुदा जारी केला आहे. याचा मुख्य उद्देश आहे – ‘डेटा नको असेल, तर त्याचे पैसे का द्यायचे?’ ट्रायने यावर सर्व पक्षांकडून सूचना मागवल्या आहेत, त्यानंतर याला अंतिम स्वरूप दिले जाईल.Mobile Recharge
नवीन प्रस्ताव काय आहे?
सध्या कंपन्या काहीच कालावधीसाठी ‘फक्त कॉल-एसएमएस’ पॅक देतात. यामुळे अनेक ग्राहकांना नाईलाजाने डेटा असलेला महागडा प्लॅन घ्यावा लागतो. आता ट्रायने असा प्रस्ताव दिला आहे की, कंपन्या जितक्या दिवसांच्या वैधतेचे, जसे की ७, २८, ५६ किंवा ८४ दिवसांचे डेटा असलेले प्लॅन आणतात, तितक्याच कालावधीचा ‘फक्त कॉल व एसएमएस’ असलेला प्लॅन देखील आणावा लागेल.Mobile Recharge
किमती किती कमी होतील?
मोबाइल प्लॅनमध्ये ५०-७०% खर्च डेटाचा असतो, त्यामुळे नवीन नियम लागू झाल्यावर फक्त कॉल-एसएमएस असलेल्या प्लॅनची किंमत निम्म्याहूनही कमी होऊ शकते. उदाहरणार्थ, ३०० रुपयांचा प्लॅन १०० ते १५० रुपयांमध्ये मिळू शकतो.
कोणाला फायदा?
फीचर फोन वापरकर्त्यांना आणि वृद्धांना, जे डेटा वापरत नाहीत. जे दुसरे सिम फक्त कॉलसाठी वापरतात. याशिवाय, ज्यांच्या घरी वायफाय आहे, त्यांच्यासाठीही हे फायदेशीर ठरेल.
1600 आणि 140 मालिकेतील महत्त्वाचे कॉल ॲप्स ब्लॉक करू शकणार नाहीत
ट्रायने स्पष्ट केले आहे की ट्रूकॉलरसारखे कॉल व्यवस्थापन ॲप्स 1600 आणि 140 मालिकेतील कॉल ब्लॉक करू शकत नाहीत…
1600 मालिका: हे बँक, वित्तीय संस्था (आरबीआय, सेबी इत्यादी) आणि सरकारी कामांसाठी निश्चित केले आहे, जेणेकरून नागरिक महत्त्वाच्या व्यवहारांशी संबंधित कोणताही कॉल ओळखू शकतील. 140 मालिका: हे कंपन्यांच्या जाहिरात कॉल्ससाठी आहे. ग्राहक स्वतः डीएनडी सेवेद्वारे त्यांना ब्लॉक करू शकतात.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App