Dilip Walse Patil आम्हाला गद्दार म्हणता? एक आरोप दाखवा; शरद पवारांच्या टीकेला दिलीप वळसे पाटलांच्या लेकीचे जोरदार प्रत्युत्तर

Dilip Walse Patil

विशेष प्रतिनिधी

अहमदनगर : Dilip Walse Patil राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी आंबेगाव येथे देवदत्त निकम यांच्या प्राचरार्थ सभा घेतली. या सभेत शरद पवारांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर गद्दार म्हणत जोरदार हल्लाबोल केला. तसेच दिलीप वळसे पाटलांना शंभर टक्के हरवण्याचे आवाहन देखील पवारांनी केले होते. यावर दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वा दिलीप वळसे पाटील यांनी पलटवार केला आहे. Dilip Walse Patil

पूर्वा दिलीप वळसे पाटील म्हणाल्या, दीड वर्षे आपण सगळ्यांची बोलणी ऐकून घेतली. वार सहन केले, गद्दार गद्दार, निष्ठाहीन, यांचा घोटाळा असेल म्हणून लोक गेले, हे सगळे ऐकून घेतले. एक आरोप आणून दाखवा साहेबांच्या विरोधात, असा थेट इशाराच पूर्वा पाटील यांनी नाव न घेत शरद पवारांना दिला आहे. पुढे त्या म्हणाल्या, इतरांचे आले तसे साहेबांचे का आले नाही? त्यांचा आपल्या पाण्यावर डोळा आहे. इतका कष्टातून उभारलेला दुष्काळी तालुका असा बनवला आहे, आता या तालुक्याचे पाणी चोरायला निघालात आणि म्हणताय गद्दारी केली. आम्ही आमच्या जनतेशी गद्दारी केली नाहही पाणी वाचवून, पाणी चोरांशी केली तर त्याच्यात शरमेची बाब काय आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.



पूर्वा दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाल्या, आमच्या मतदारसंघाचे पाणी, आमच्या तालुक्याचे पाणी, सात लाख जनतेचे पाणी, सात लाख शेतकऱ्यांचे पाणी जे पळवून नेतात त्यांच्याशी आपल्या साहेबांनी गद्दारी केली. सात लाख लोकांचा लढा आपले साहेब लढत आहेत, त्याचे काय? या गोष्टींचे खंडन झाले का त्या सभेत, आले का समोर व्हिडिओ? असा प्रश्न त्यांनी विचारला. सहा महीने पाणी नाही आले तर आपण रस्त्यावर येऊ, आपल्या तोंडातील घास काढून दुसऱ्यांच्या तालुक्यात हे लोक दिवाळी करायला निघाले आहेत, काही तरी लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात पूर्वा दिलीप वळसे पाटील यांनी टीका केली आहे.Dilip Walse Patil

पुढे पूर्वा दिलीप वळसे पाटील म्हणाल्या, 2018 मध्ये साहेबांनी म्हणले होते की जे अतिरिक्त पाणी आहे धरणातील ते बोगद्याने हमखास न्या, 11 मीटरच्या पातळीवर बोगदा करा आणि हमखास न्या पण त्यांना तळामध्ये 1 मीटर पातळीवर बोगदा करुन पाणी त्यांच्या तालुक्यात न्यायचे आहे. समोरच्या पक्षातील ज्येष्ठ असतील किंवा इतर कोणी असतील कोणी याचे खंडण करत नाहीत म्हणजे आपली किती जमेची बाजू आहे समजून घ्या, असेही त्या म्हणाल्या.

Dilip Walse Patil daughter strongly responds to Sharad Pawar’s criticism

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात