Narendra Modi शिवतीर्थावर मोदींची गर्जना- मविआचे लोक तुष्टीकरणाचे गुलाम, त्यांची विचारधारा महाराष्ट्राचा अपमान करणारी

Narendra Modi

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Narendra Modi मुंबई येथील शिवतीर्थावर पार पडलेल्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी म्हणाले- या विधानसभेची माझी ही शेवटची सभा असणार आहे. मी सर्वत्र दौरा केला, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण. सगळीकडून मला लोकांचे भरगोस प्रेम आणि आशीर्वाद मिळाले. तसेच महायुतीला देखील महाराष्ट्राने प्रेम दिले आहे. Narendra Modi

पंतप्रधान मोदींनी मुंबईतील सर्व मंदिरांना प्रणाम करून भाषणाला सुरुवात केली. आज माझी महाराष्ट्रातील शेवटची सभा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. सर्वत्र लोकांशी बोललो. संपूर्ण महाराष्ट्राचा महायुतीला आशीर्वाद आहे. महायुती आहे तर गती आहे. अनेक संत आणि विद्वानांनी इथूनच दिशा दाखवली.. इथूनच शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा मार्ग दाखवला.

आज एकीकडे महायुतीची विचारधारा आहे, दुसरीकडे आघाडी जी विचारसरणीचा अपमान करत आहे. आघाडी तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे, ही आघाडी भगव्या दहशतवादावर बोलत आहे, ते सावरकरांचा अपमान करतात, 370 हटवण्यास विरोध करतात.Narendra Modi

महाविकास आघाडीसाठी पक्ष देशापेक्षा वरचढ आहे. हे लोक भारताच्या कर्तृत्वावर प्रश्न उपस्थित करतात. हे तेच लोक आहेत ज्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही. त्याच्या विचारांपासून आपण सावध राहायला हवे.

मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे आणि ती प्रत्यक्षात आणणारी महायुती आहे. आज सर्वसामान्यांची स्वप्ने पूर्ण होत आहेत. तसेच मोदींनी मुंबईतील स्टार्ट अप योजना, गृहकर्ज आणि इतर समस्यांबद्दल भाष्य केले.

मोदी म्हणाले, हेच पोलीस होते, हीच एजन्सी आणि सरकार. पण आता मोदी आहे. काँग्रेसच्या काळात मुंबईसह देशभरात दहशतवादी घटनांची भीती का दाखवली जायची, याचा विचार करावा लागेल. त्यावेळी रेल्वे आणि इतर ठिकाणी सावधान राहा असे ऐकायला मिळत होते. आज मोदी आहे, देशाविरुद्ध काही केले तर मोदी तुम्हाला नरकातही सोडणार नाहीत. Narendra Modi

मोदी पुढे म्हणाले, महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. नवनवीन उद्योगांचे नेतृत्व महिला करत आहेत. मुंबईतून अनेक स्टार्ट अप सुरू झाले आहेत. त्यात महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.


Ashok Chavan : अशोक चव्हाणांचे बाळासाहेब थोरातांना प्रत्युत्तर; काँग्रेसमध्ये असताना 14 वर्षे खूप सोसले, आता चारही बाजूंनी हल्ले


राहूल गांधी जे संविधान घेऊन फिरत आहेत हे संविधान कोऱ्या कागदाचे संविधान आहे. लाजिरवाणी बाब आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान इतक्या दशकात संपूर्ण देशात लागू झाले नाही. काँग्रेसने लपवून ठेवले. काश्मीरमध्ये त्यांचा कायदा चालला नाही. 370 भिंत उभी केली होती. तुम्ही आशीर्वाद दिलात तेव्हा आम्ही 370 जमिनीत गाडले. आजपर्यंत काश्मिरातील न्यायमूर्तींनी भारतीय राज्यघटनेवर हात ठेवून शपथ घेतली नाही..यावेळी पहिल्यांदाच घडले..आता मला महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी द्या, असे मोदी म्हणाले.

20 तारखेला विक्रमी मतदानाची जबाबदारी मी तुमच्यावर देत आहे. महायुतीच्या उमेदवारांना विजय मिळवून द्यायचा आहे. नवीन महायुती सरकारच्या शपथविधीची तयारी करायची आहे. मी आज तुम्हाला शपथविधीसाठी आमंत्रण देण्यासाठी आलो आहे. मी इतर राज्यांच्या निवडणुका पाहतोय. हरियाणापेक्षाही चोख प्रत्युत्तर महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये पाहायला मिळेल, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.

तुम्ही जिहाद कराल तर धर्मयुद्धाने उत्तर देऊ- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वप्रथम मी मोदीजींचे अभिनंदन करतो. काही लोक फेसबुक लाईव्ह करतात आणि स्वतःला उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणवून घेतात. मी यावर जास्त काही बोलणार नाही, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

फडणवीस म्हणाले, मागील सरकारांनी 11 वर्षात 11 किलोमीटरची मेट्रो बांधली. आम्ही 300 किलोमीटरची योजना आखली. पुढे त्यांनी मुंबईतील लोकांच्या घरांच्या आणि इतर पुनर्विकासावरही भाष्य केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी केलेल्या कामावर मते मागत आहे. माझा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना प्रश्न आहे, माझा महाविकास आघाडीला प्रश्न आहे, उलेमांची मागणी मान्य करण्यापूर्वी तुम्ही वाचले का, त्यांची मागणी होती.. दंगलीत सहभागी असलेल्या मुस्लिमांची सुटका करा. जर तुम्ही जिहाद कराल तर आम्ही त्याला धर्म युद्धाने उत्तर देऊ.

Narendra Modi roar at Shiv Tirtha – The people of MVA are slaves to appeasement, their ideology is an insult to Maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात