वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकारने CISFच्या महिला बटालियनच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. या बटालियनमध्ये 1000 हून अधिक महिलांचा समावेश असेल. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या बटालियन कमांडोप्रमाणे सुरक्षा पुरवतील.
सध्या देशात 12 CISF बटालियन आहेत, पण त्यामध्ये एकही महिला बटालियन नाही. ही पहिली बटालियन असेल, ज्यामध्ये फक्त महिला असतील.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी या बटालियनला मंजुरी दिली. बटालियनमध्ये समाविष्ट असलेल्या महिला सैनिकांना विमानतळ, दिल्ली मेट्रो आणि व्हीआयपींच्या सुरक्षेत कमांडोप्रमाणे तैनात केले जाईल. गरजेनुसार ते इतर ठिकाणीही तैनात केले जातील.
sharad pawar and ajit pawar काका – पुतण्यांची निवडणुकीच्या ऐन मध्यात जुंपली; अदानींना घेतले मधी!!
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काय म्हणाले?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी ट्विटरवर लिहिले की, ‘राष्ट्र उभारणीच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्याच्या मोदी सरकारच्या दृष्टीकोनातून एक ठोस पाऊल उचलत सीआयएसएफच्या पहिल्या महिला बटालियनच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे . सीआयएसएफची महिला बटालियन लवकरच देशातील विमानतळ आणि मेट्रो रेल्वेचे संरक्षण आणि कमांडो म्हणून व्हीआयपींना सुरक्षा प्रदान करण्याची जबाबदारी स्वीकारणार आहे.
महिला भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार
5 मार्च 2022 रोजी 53 व्या CISF दिनानिमित्त अमित शहा यांनी महिला बटालियन स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. आता त्याला मंत्रालयाकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे. CISF लवकरच पहिल्या सर्व-महिला बटालियनसाठी भरती प्रक्रिया सुरू करेल.
सीआयएसएफचे डीआयजी दीपक वर्मा म्हणाले की, गृह मंत्रालयाच्या मान्यतेने यावर काम सुरू करण्यात आले आहे. सध्या CISF मध्ये महिलांची संख्या सुमारे 7% आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App