विशेष प्रतिनिधी
नाशिक : Sharad Pawar येवल्यात जाऊन शरद पवारांनी छगन भुजबळांवर केला हल्लाबोल; पण पवारांनी नरसिंह रावापुढं कशी नांगी टाकली, शिवसेना कशी फोडली, तेलगी प्रकरणात कसे अडकवले याची भुजबळांनी पुरती पोलखोल केली.Sharad Pawar
पवारांचा नाशिक दौरा आज शरद पवार विरुद्ध छगन भुजबळ अशा राजकीय जुगलबंदीने गाजला. शरद पवारांनी छगन भुजबळांवर येवल्यात जाऊन तोफा डागल्या. छगन भुजबळ गद्दार आहेत. त्यांना मोठी संधी दिली तरी ते समजूत काढण्याच्या निमित्ताने तिकडे गेले आणि दुसऱ्या दिवशी शपथ घेतली त्यांना आता येवल्यातून सोडू नका इथेच पाडा, असा जोरदार हल्लाबोल पवारांनी केला. छगन भुजबळ भ्रष्टाचारी होते म्हणूनच त्यांना मुख्यमंत्री केले नाही असाही दावा पवारांनी केला.
भुजबळ यांनी देखील मग पवारांची काही शिल्लक ठेवली नाही. त्यांनी सगळा जुना इतिहास काढून पवारांची पुरती पोलखोल केली.
छगन भुजबळ म्हणाले :
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला नगरसेवक, महापौर केलं. याबद्दल मी अनेकदा आभार मानले. पण आता शरद पवार का बोलले?? मला कळत नाही. शिवसेना फोडण्याचे “पुण्यकर्म” शरद पवारांनी केले. मी तर 36 लोकांच्या सह्या झाल्यानंतर शेवटी गेलो. शिवसेना फोडण्याचे काम त्यांनी केले. मी शिवसेना फोडू शकत नव्हतो. माझ्यात काहीतरी असेल म्हणून मला बाळासाहेबांनी महापौर केलं, म्हणूनच तुम्ही मला मंत्री केलं, आता बदनाम करण्यासाठी निवडणूकीत बोलला., अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.
2004 ला मुख्यमंत्री केलं असतं, बरं मला नाही केलं, आर आर पाटील, अजित दादा यांना का नाही केलं?? सुधाकरराव नाईक यांना शरद पवारांनी मुख्यमंत्री केलं, जेव्हा ते दिल्लीला गेले होते, नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात गेले होते. नाईकांशी टोकाचे मतभेद झाले तेव्हा दंगे झाले होते. नरसिंह राव यांनी परत शरद पवारांना महाराष्ट्रात पाठविले, मुख्यमंत्री केल्यावर वरचढ होतात म्हणून त्यांनी ना भुजबळ, ना आर. आर. पाटील, ना अजितदादाला मुख्यमंत्री केलं, हे खरं रहस्य आहे.
तेलगी प्रकरणात अडकवले
शरद पवार कधीपासून भविष्य पाहायला लागले?? मला काहीही दोष नसतांना तेलगी प्रकरणात उगाच गोवलं गेलं. ऑफिसरमधील वाद होते, मला राजीनामा द्यायला लावला. हल्ला झाला. मला माहिती नव्हते, लोक चिडले म्हणून सांगितले. प्रफुल्ल पटेल यांनी ताबडतोब बोलून घेतले. पटेल म्हणाले, राजीनामा द्यायला पाहिजे. मी राजीनामा द्यायच्या आधी त्यांनी राजीनामा देणार म्हणून जाहीर करून टाकलं.
काही घटना विचित्र वाईट घडत होत्या. मुकेश गांधी यांनी मला तेव्हा मदत केली. सुप्रीम कोर्टात गेलो. तेलगी प्रकरण 3-4 राज्यातील होतं. सीबीआयकडे प्रकरण होतं. तेव्हा वाजपेयी सरकार होते. इथे माझं सरकार होतं. तेव्हा माझी मागणी होती. इथं नको तिकडे द्या सीबीआयकडे. मॅटमध्ये तक्रार गेल्यावर हे प्रकरण सांगितलं. समीर भाऊलाही बोलावलं. गाडीभर कागद गोळा झाले. पण भुजबळ नाव एकही कागदावर नव्हतं.
भुजबळचा ग्राफ चढता होता तो खाली आला. माझ्या मनात शंका होती तर बाकीचे होते. कुणालाही मुख्यमंत्री केलं नाही. सुधाकरराव नाईक यांचे उदाहरण डोळ्यासमोर आहेच, आज सर्व बोलणार नाही. काँग्रेसचा विरोधी पक्षनेता, वन मॅन आर्मी शिवसेना-भाजप विरोधात लढत होतो. माझ्यावर प्रचंड मोठा हल्ला झाला, मी देवाच्या कृपेने वाचलो. बाळासाहेब माझी टिंगल करत होते, लाखोबा म्हणाले. काही काळ मी भांडलो पण नंतर जाऊन भेटलो.
पण पवार साहेब, काँग्रेसने तुम्हाला बाजूला केलं तेव्हा भुजबळ पहिला माणूस तुमच्या बरोबर होता. कलमाडी, वासनिक बाकीचे सगळेच मला बोलत होते जाऊ नका. काँग्रेसमध्ये राहिलो असतो तर पुढचा मुख्यमंत्री करणार होते. पवार साहेबांसाठी मी लढलो. माझ्यावर हल्ला झाला तेव्हा ते फ्लाईटने आले होते भेटायला. मला काही दिले असेल, तर मी लढलो म्हणून दिले.
आत्ताच या गोष्टी काढण्याचा काय अर्थ होता?? बडे मुर्दा उखडणे चांगलं नाही. उकरायला लागलो तर बात दूरतक जाएगी. जेलमधून आल्यावर सांगत होते जाऊ नका भेटायला, तरी मी शरद पवार भेटायला गेलो. कोणीही राजकारणात उचलून पद देत नाही, तो मनुष्य काहीतरी लढत असतो. अजितदादा रात्रंदिवस काम करतात म्हणून उपमुख्यमंत्री केलं ना? उमेदवार द्यायला किती चाळण्या लावतात, थेट काही मिळत नाही, पवार साहेबांना माझी विनंती आहे त्यांनी आता बोलू नये नाहीतर मला सुद्धा स्पष्टीकरण द्यायला बोलावे लागेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App