कारखान्याच्या आजूबाजूला सुमारे ४० ते ५० रहिवाशी घरे आहेत.आग लागतच रहिवासी परिसरात एकच खळबळ उडाली होती. Bhiwandi: Fire brigade fires three vehicles of fire brigade
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भिवंडीत आज पहाटेच्या सुमारास शहरातील काजी कंपाऊंड परिसरामध्ये असलेल्या एका यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागली आहे.घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या.दरम्यान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी २ तास लागले.
आगीचे कारण अद्यापही समोर आले नसून आतापर्यत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहेया कारखान्यात कपड्यांचा मोठ्या प्रमाणात साठा साठवून ठेवण्यात आला आहे. तर, कारखान्याच्या आजूबाजूला सुमारे ४० ते ५० रहिवाशी घरे आहेत.आग लागतच रहिवासी परिसरात एकच खळबळ उडाली होती.
ही आग एवढी भीषण होती की कारखानाच्या छताचे पत्रे तुटून हवेत उडत होते.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान, खबदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App