काँग्रेस सोडणारे अशोक चव्हाण हे 13 वे मुख्यमंत्री; पुढचा नंबर कोणाचा??

Ashok Chavan who left the Congress is the 13th Chief Minister; Whose next number?

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : महाराष्ट्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपचे कमळ हाती घेतले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला. काँग्रेस पक्षाला त्याचे हादरे बसले, पण काँग्रेसला अशा राजकीय भूकंपाचे हादरे देणारे अशोक चव्हाण हे काही एकमेव माजी मुख्यमंत्री नाहीत, तर काँग्रेस सोडणारे ते 13 वे मुख्यमंत्री आहेत. याचा अर्थ काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर गेल्या 10 वर्षांमध्ये 13 माजी मुख्यमंत्र्यांनी विशिष्ट कारणांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. Ashok Chavan who left the Congress is the 13th Chief Minister; Whose next number?

काँग्रेस सोडणाऱ्यांमध्ये अमरिंदर सिंग (पंजाब), गुलाम नबी आझाद (जम्मू आणि काश्मीर), विजय बहुगुणा (उत्तराखंड), दिवंगत अजित जोगी (छत्तीसगड), एस. एम. कृष्णा (कर्नाटक), नारायण राणे (महाराष्ट्र), किरण कुमार रेड्डी (आंध्र), पेमा खांडू (अरुणाचल) आणि गिरीधर गमांग (ओडिशा). (गमंग नुकतेच पार्टीत परतलेत.). गोव्यातील 3 (लुझिन्हो फालेरो, दिगंबर कामत, रवी नाईक) या सगळ्यांनी काँग्रेस सोडून भाजपचे कमळ हाती धरले आहे.



काँग्रेस संघटना कमकुवत

यापैकी बहुतेकांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते पक्ष संघटनेकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळेच वेगवेगळ्या राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष संघटनेची पीछेहाट झाली, असे आरोप करूनच काँग्रेस सोडून भाजपचे कमळ हाती धरले आहे. यापैकी सगळे नेते राज्यांचे मुख्यमंत्री तर राहिलेच होते, पण त्याचबरोबर राज्यांमधली काँग्रेस संघटना देखील काही काळ त्यांच्या नियंत्रणाखाली होती.

पण 2014 मध्ये केंद्रातली सत्ता गेल्यानंतर काँग्रेस संघटना हळूहळू निष्प्रभ होत गेली. वर उल्लेख केलेल्या नेत्यांचाही प्रभाव कमी होत गेला. स्वतःच्या प्रभावातून ते आपापल्या राज्यांमध्ये काँग्रेस संघटना मजबूत ठेवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी भाजपचे कमळ हाती धरण्याची पर्याय उरला नव्हता.

Ashok Chavan who left the Congress is the 13th Chief Minister; Whose next number?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात