अशोक चव्हाणांची आज भाजपमध्ये एंट्री; काँग्रेस नेते घालताहेत उरलेल्या आमदारांना आडकाठी!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात अत्यंत वेगाने घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण आज भाजपमध्ये एन्ट्री करण्याच्या तयारीत आहेत, तर त्यांच्याबरोबर काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्यासाठी तयारीत असलेल्या आमदारांना काँग्रेसचे नेते आडकाठी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशोक चव्हाण यांनी निर्णय घेण्यासाठी 48 तासांची मुदत स्वतःच घालून घेतली होती. पण ते आजच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी आहे.Ashok Chavan’s entry into BJP today; Congress leaders are blocking the rest of the MLAs!!

अशोक चव्हाण गेले तरी त्यांच्या समावेत बाकीच्या काँग्रेस आमदारांनी जाऊन पक्षाचे आणखी पडझड होऊ नये यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी आमदारांची बैठक बोलावली असून वरिष्ठ नेत्यांनी प्रत्येक आमदाराशी संपर्क साधून त्यांना बैठकीत पुढे घालून घेऊन येण्याचे ठरविले आहे. माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी 22 आमदारांशी संपर्क साधल्याचे त्यांनी स्वतःच पत्रकारांना सांगितले.अशोक चव्हाण यांच्या समावेत आमदार अमर राजूरकर हे काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेसला गेल्या काही दिवसांपासून गळती सुरु आहे. माजी खासदार मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे आता काँग्रेसला मोठं भगदाड पडलं आहे. काँग्रेस नेते चव्हाण यांनी सोमवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यासोबतच चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. त्यानंतर आज अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

‘मी दिनांक 12/02/2024 च्या मध्यान्हापासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करत आहे,’ असे पत्र अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांना पाठवले होते. त्यावर माजी विधानसभा सदस्य असेही लिहिलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर ‘भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे,’ अशी पोस्ट अशोक चव्हाण यांनी केली. त्यानंतर अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आज अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याचा माझा निर्णय पूर्णत: वैयक्तिक आहे. कुठल्याही आमदाराशी मी याबाबत चर्चादेखील केलेली नाही. अन्य कोण काय निर्णय घेणार हे मला माहिती नाही. मी कोणाशीही संपर्क साधलेला नाही. पक्षाने मला खूप काही दिले आणि मी देखील मनापासून अनेक वर्षे पक्षाची सेवा केली आहे. येत्या दोन दिवसात राजकीय दिशा ठरवेन. मला काही अवधी लागेल. पण दोन दिवसात जाहीर करेन. भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय घेतला नाही, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले होते.

देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची प्रतिक्रिया

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाबद्दल तुमच्याकडूनच ऐकतोय. पण काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहेत. आगे आगे देखो होता है क्या!!, असे सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या पोटात गोळा आला आहे.

Ashok Chavan’s entry into BJP today; Congress leaders are blocking the rest of the MLAs!!

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*