EPFO: 2023-24 साठी व्याजदर निश्चित, खातेदारांना आता इतका परतावा मिळेल


EPFOच्या निर्णयाचा देशातील 7 कोटी ग्राहकांना फायदा होणार आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : तुम्ही नोकरदार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण भविष्य निर्वाह निधी संघटनेने पीएफ खातेधारकांना मिळणाऱ्या व्याजात वाढ केली आहे. माहितीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 8.25 टक्के दर निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच व्याजदर 0.10 टक्क्यांनी वाढले आहेत.EPFO Interest rate fixed for 2023 24 account holders will get so much return now



आत्तापर्यंत EPFO ​​ग्राहकांना 8.15 टक्के व्याज दिले जात होते. EPFOच्या निर्णयाचा देशातील 7 कोटी ग्राहकांना फायदा होणार आहे. याचा अर्थ आता पीएफ खातेधारकांना पूर्वीपेक्षा जास्त परतावा मिळणार आहे.

पीएफवरील नवीनतम व्याजदर अधिकृतपणे घोषित करण्यात आलेला नाही. केंद्रीय विश्वस्त मंडळाची आज बैठक होत आहे.बैठकीनंतर या निर्णयाला मान्यता दिली जाईल. केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पीएफवरील व्याजदराची अधिकृत माहिती कामगार मंत्रालयाकडून नंतर दिली जाईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएफ खातेधारकांना आर्थिक वर्ष 2023-24 साठी पीएफ खात्यात ठेवलेल्या पैशांवर जास्त परतावा मिळणार आहे. यापूर्वी, पीएफ खातेधारकांना आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 8.15 टक्के दराने आणि 2021-22 मध्ये 8.10 टक्के दराने व्याज मिळाले होते.

EPFO Interest rate fixed for 2023 24 account holders will get so much return now

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात