PSU शेअर्सवर मोदींची हमी! पंतप्रधानांच्या भाषणानंतर 22 मल्टीबॅगर्स अन् 24 लाख कोटींचा नफा


मोदींनी गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा मंत्र दिला होता

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 10 ऑगस्ट रोजी गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा मंत्र दिला होता. संसदेत दिलेल्या भाषणात त्यांनी गुंतवणूकदारांना सरकारी कंपन्यांवर गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. मोदींच्या भाषणापासून आतापर्यंत 22 सरकारी कंपन्यांनी मल्टीबॅगर परतावा दिला आहे. 22 multibaggers and profit of 24 lakh crores after Tapradhan’s speech

म्हणजेच गेल्या सहा महिन्यांत या शेअर्सच्या किमती 100 टक्केपेक्षा जास्त वाढल्या आहेत. या कालावधीत, 56 समभागांचा समावेश असलेल्या BSE, PSU निर्देशांकाचे बाजार मूल्य 66टक्केने वाढून 59.5 लाख कोटी रुपये झाले आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांना 23.7 लाख कोटी रुपयांचा नफा झाला आहे.विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या भाषणापासून गेल्या सहा महिन्यांत एकाही सरकारी कंपनीने नकारात्मक परतावा दिलेला नाही. या कालावधीत SBI चा सर्वात वाईट कामगिरी करणारा स्टॉक देखील 12टक्क्यांनी वाढला आहे, तर NBCC चे शेअर्स सर्वात जास्त 249 टक्के वाढले आहेत. या कालावधीत, IRFC शेअर्स 225 टक्के वाढले आहेत.

याशिवाय, HUDCO, ITI, SJVN, कोचीन शिपयार्ड, MMTC, BHEL, REC, मंगलोर रिफायनरी, RVNL, PFS, NMDC, NLC इंडिया, IRCON, द न्यू इंडिया ॲश्युरन्स आणि जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनने त्यांच्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि युको बँकेनेही या कालावधीत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.

22 multibaggers and profit of 24 lakh crores after Tapradhan’s speech

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात