विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणूक जाहीर वगैरे काही दिवस उरले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आपकी बार 400 पार होईल असा दावा केला, तर भाजपला 370 जागा मिळण्याचे भाकीत केले. या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे आणि सी व्होटर संस्थेने “मूड ऑफ द नेशन” सर्व्हे केला आहे. यामध्ये कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचे अंदाज वर्तविले आहेत या अंदाजातून महाराष्ट्रात काका – पुतण्याच्या दोन्ही राष्ट्रवादींना प्रत्येकी सिंगल डिजिटच जागा मिळण्याचे भाकीत वर्तविले आहे. Whether the party remains united or splits, there is no change in the digit
महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यातील स्थिती वेगळी असल्याने त्याचाही निवडणुकीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. सर्व्हेनुसार, उत्तर प्रदेशात भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 80 पैकी 72 जागा मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात आज निवडणूक झाली तर महाविकास आघाडी भाजप, शिंदे आणि अजित पवार यांच्यावर वरचढ होताना दिसत आहे. महाविकास आघाडीला 44.5 % मतांसह 48 पैकी 26 जागा मिळताना दिसत आहेत, तर भाजपा महायुतीला युतीला 40.5 % मते मिळतील असा अंदाज आहे.
भाजपा महायुतीला एकूण 22 जागा, यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांना मिळून 6 जागा, तर काँग्रेसला 12 आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळून 14 जागा मिळतील, असा अंदाज सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. याचा अर्थ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि अजित पवारांचा राष्ट्रवादीला प्रत्येकी सिंगल डिजिटमध्येच जागा मिळू शकणार आहेत. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र राहिली किंवा फुटली तरी त्यांच्या डिजिटमध्ये बदल झालेला नाही, असेच सर्वेक्षणातून दिसते.
गुजरातमध्ये भाजपाला क्लीन स्वीप
सर्व्हेमध्ये भाजपाला पुन्हा एकदा क्लीन स्वीप मिळताना दिसत आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाने सर्व 26 जागांवर विजय मिळवला होता. गुजरातमधील जनता यावेळीही भाजपावरच विश्वास दाखवताना दिसत आहे. गुजरातमध्ये भाजपाला एकूण मतांच्या 62.1 % मते मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 26.4 % मते मिळत आहेत. इतर छोट्या पक्षांना 12 % मते मिळत आहेत.
दरम्यान सर्व्हेनुसार, उत्तर प्रदेशात भाजपा युतीला 80 पैकी 72 जागा मिळत आहेत, तर उत्तराखंडमधील पाचही जागा, हिमाचलमधील चारही जागा, हरियाणामध्ये 10 पैकी 8, पंजाबमध्ये दोन, मध्यप्रदेशात 29 पैकी 27, तर छत्तीसगडमध्ये 11 पैकी 10 जागा मिळण्याची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more