हिंदू फक्त तीन मंदिरे मागताहेत, पांडवांनी पाच गावे मागितली होती, पण…; योगी आदित्यनाथ यांचे “सूचक” उद्गार!!


विशेष प्रतिनिधी

लखनौ : अयोध्यातले राम मंदिर उभे राहिले या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विधानसभेचे अत्यंत सूचक विधान केले आहे. हिंदू फक्त तीन मंदिरे मागत आहेत. पांडवांनी कौरवांकडे पाच गावे मागितली होती पण ती त्यांनी दिली नाही नंतर काय झाले हे आपल्याला माहिती आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. Adityanath’s big statement on Kashi, Mathura: ‘Krishna asked for 5 villages, we want 3 centres’

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराच्या संदर्भात गौरवपूर्ण उद्गार काढले. पण त्याच वेळी राम मंदिरासाठी झालेल्या संघर्ष याचाही आवर्जून उल्लेख केला. किंबहुना आदित्यनाथ त्यांचे भाषण राम मंदिराभोवतीच केंद्रित होते.

योगी आदित्यनाथ म्हणाले, की राम मंदिराचे काम खरे म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच व्हायला हवे होते. पण ते काम काही राज्यकर्त्यांच्या आडमुठेपणामुळे झाले नाही. राज्यकर्त्यांनी अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणामुळे राम मंदिराच्या कामात अडचणी उभ्या केल्या. यामुळे त्यांचे राजकारण साध्य झाले. परंतु हिंदू समाजाविषयी जगभर द्वेष आणि गैरसमज निर्माण झाला. परंतु आता काळ बदलला आहे. हिंदू समाज जागृत झाला आहे. त्यामुळे अयोध्येत भव्य राम मंदिर उभे राहते आहे.

हिंदू फक्त तीन मंदिरे मागत आहेत. पांडवांनी कौरवांकडे फक्त पाच गावे मागितली होती, पण ती त्यांनी दिली नाहीत, त्यानंतर काय झाले हे सगळ्यांना माहिती आहे, असे सूचक वक्तव्य करून त्यांनी भविष्यातील “महाभारताची” नांदीच केली.

Adityanath’s big statement on Kashi, Mathura: ‘Krishna asked for 5 villages, we want 3 centres’

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात