सध्या कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.
विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : पाकिस्तानातून मोठी बातमी समोर येत आहे. निवडणुकीदरम्यान झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे येथे खळबळ उडाली आहे. गुरुवारी सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान दहशतवाद्यांनी दुपारी मोठा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. खैबर पख्तूनख्वामधील डेरा इस्माइल खान जिल्ह्यातील कुलाची येथे दहशतवाद्यांनी पोलिस व्हॅनला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.Terrorist attack during election in Pakistan five people died atmosphere of terror
पाकिस्तानमध्ये गुरुवारी ८ फेब्रुवारीला सकाळपासून सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. काही ठिकाणी चकमकी झाल्याच्या बातम्या येत असल्या तरी या सगळ्यामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने सर्वांनाच हादरवून सोडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नियोजन करून आलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांच्या मोबाइल व्हॅनला लक्ष्य केले. या दहशतवाद्यांनी आधी आयईडी ब्लॉस्टने हल्ला केला आणि त्यानंतर लगेचच वेगाने गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांनी एक-दोन मिनिटे नव्हे तर ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे.
दहशतवाद्यांनी केलेल्या आयईडी हल्ल्यात पोलिस व्हॅन उद्ध्वस्त झाली. हा स्फोट इतका जबरदस्त होता की त्याचे प्रतिध्वनी दूरवरच्या लोकांना ऐकू आले. हल्ल्यानंतर परिसरात गोंधळाचे वातावरण आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. या हल्ल्यात चार ते पाच पोलिसांचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर तीन पोलिसही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. मात्र पोलिसांनी या परिसराचे छावणीत रुपांतर केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more