वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील परिस्थिती भयावह बनली आहे. ही लाट अत्यंत प्राणघातक होत आहे. आता केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी बुधवारी देशात तिसरी लाट येण्याचा इशारा दिला आहे. Corona 3rd Wave vijay raghwan vaccine upgrade
विजय राघवन यांनी म्हटलं की, कोरोनाच्या संसर्गाची प्रकरण वाढत आहेत. तिसरी लाट कधी येईल हे सांगता येणार नाही. पण ती नक्की येणार आहे. त्यामुळे परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहिलं पाहिजे.
नवीन कोरोनाच्या स्ट्रेनचा सामना करण्यासाठी लस अपग्रेड करावी लागणार आहे. लस अपग्रेड करण्याबरोबरच सर्व्हिलान्सचीही गरज असेल, असं विजय राघवन यांनी म्हटलं. विजय राघवन म्हणाले की, 18 ते 44 व वयोगटातील 6 लाख 71 हजार लोकांना लसीचे डोस दिले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि उत्तर प्रदेशसह 12 राज्यात एक लाखाहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
A phase three is inevitable, given the higher levels of circulating virus but it is not clear on what time scale this phase three will occur. We should prepare for new waves: K VijayRaghavan, Principal Scientific Advisor to Centre pic.twitter.com/c6lRzYaV2q — ANI (@ANI) May 5, 2021
A phase three is inevitable, given the higher levels of circulating virus but it is not clear on what time scale this phase three will occur. We should prepare for new waves: K VijayRaghavan, Principal Scientific Advisor to Centre pic.twitter.com/c6lRzYaV2q
— ANI (@ANI) May 5, 2021
बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App