Mini Lockdown IN West Bengal : प. बंगालमध्ये निवडणुका सुरू असतानाच कोरोना महामारीचा उद्रेक दिसून आला होता. तथापि, सर्वच निवडणुकीच्या प्रचारात मश्गुल असल्याने राज्यात आनंदीआनंद सुरू होता. आता मात्र मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर ममता बॅनर्जींना यांना कोरोनाची आठवण झाली आहे. शपथ घेतल्याच्या दिवशीच त्यांनी बंगालमध्ये मिनी लॉकडाऊन लावले आहे. Mamata Banerjee Declarers Mini Lockdown IN West Bengal Soon After sworn in as CM
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : प. बंगालमध्ये निवडणुका सुरू असतानाच कोरोना महामारीचा उद्रेक दिसून आला होता. तथापि, सर्वच निवडणुकीच्या प्रचारात मश्गुल असल्याने राज्यात आनंदीआनंद सुरू होता. आता मात्र मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर ममता बॅनर्जींना यांना कोरोनाची आठवण झाली आहे. शपथ घेतल्याच्या दिवशीच त्यांनी बंगालमध्ये मिनी लॉकडाऊन लावले आहे.
पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी राज्यात लॉकडाऊनसदृश्य निर्बंध जाहीर केले आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील लोकलही बंद करण्यात आल्या आहेत. राज्यातील दुकाने काही तास सुरू राहण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. कोरोना साथीच्या दुसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बंगालमधील निवडणूक सभांवर राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोगाला टीकेला सामोरे जावे लागले होते.
निर्बंधांची घोषणा करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, कोरोना महामारीचे संकट पाहता आम्ही काही पावले उचलली आहेत. मास्क घालणे अनिवार्य आहे, तर केवळ 50 टक्के कर्मचारी राज्य सरकारच्या कार्यालयांमध्ये हजर असतील. खासगी क्षेत्राला घरून काम देण्यास सांगण्यात आले आहे, तेथेही जास्तीत जास्त 50 टक्के कर्मचारी कार्यालयात राहू शकतात. शॉपिंग कॉम्प्लेक्स, जिम, सिनेमा हॉल, ब्युटी पार्लर बंद राहतील. याशिवाय गर्दीच्या कार्यक्रमांनाही बंदी आहे.
दुपारी 12 ते दुपारी 3 या वेळेत दागिन्यांची दुकाने उघडतील, असे ममता यांनी सांगितले. होम डिलिव्हरीला प्रोत्साहन मिळेल. बँका सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत उघडतील. मुख्यमंत्री म्हणाल्या की, सर्व बाजारपेठा, किरकोळ दुकाने सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 7 सुरू राहतील.
Mamata Banerjee Declarers Mini Lockdown IN West Bengal Soon After sworn in as CM
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App