Bengal Violence : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पश्चिम बंगालमधील हिंसक घटनांवरून ममता बॅनर्जी सरकारवर निशाणा साधला आहे. दोन दिवसांच्या बंगाल दौर्यावर दाखल झालेले जेपी नड्डा यांनी बुधवारी कोलकाता येथे पत्रकार परिषदेत म्हटले की, ममता बॅनर्जी यांनी हिंसाचाराबद्दल मौन बाळगल्यामुळे त्यांचा यात सहभाग स्पष्टपणे प्रतिबिंबित झाला आहे. त्यांनी रक्ताने माखलेल्या हातांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात केली आहे. Bengal Violence JP Nadda Says, Mamata’s hands stained with blood, one lakh people flee Bengal for fear of death
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पश्चिम बंगालमधील हिंसक घटनांवरून ममता बॅनर्जी सरकारवर निशाणा साधला आहे. दोन दिवसांच्या बंगाल दौर्यावर दाखल झालेले जेपी नड्डा यांनी बुधवारी कोलकाता येथे पत्रकार परिषदेत म्हटले की, ममता बॅनर्जी यांनी हिंसाचाराबद्दल मौन बाळगल्यामुळे त्यांचा यात सहभाग स्पष्टपणे प्रतिबिंबित झाला आहे. त्यांनी रक्ताने माखलेल्या हातांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात केली आहे.
जेपी नड्डा म्हणाले की, बंगालमधील भाजप समर्थकांच्या हत्या, महिलांच्या छळाचा मी निषेध करतो. बंगालमधील निवडणुका झाल्यानंतर ‘राज्य पुरस्कृत’ हिंसाचारात 14 भाजप कार्यकर्ते ठार झाल्याचा दावा नड्डा यांनी केला. याशिवाय बंगाल निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसच्या विजयानंतर 80 हजार ते एक लाख लोक हल्ल्याच्या भीतीने घर सोडून गेले आहेत, असेही ते म्हणाले.
नड्डा म्हणाले की, नरसंहार आणि निर्घृण हत्या घडल्या तेव्हा काळजीवाहू मुख्यमंत्री 36 तास शांत राहिल्या. ममतांचे मौन त्यांचा हिंसाचारातील सहभाग सांगतोय. त्या आपल्या रक्ताने माखलेल्या हातांनी तिसरा कार्यकाळ सुरू करत आहेत. आम्ही जे निवडणूक प्रचार म्हणालो होतो की, बंगालमध्ये महिला सर्वात असुरक्षित आहेत, ते बरोबरच होते.
नड्डा पुढे म्हणाले की, बंगालमध्ये सर्वप्रथम लोकांवर हल्ले, नंतर कुटुंबीयांवर हल्ला, मग महिलांवर हल्ले आणि त्यानंतर लूटमार आम्हाला पाहायला मिळाली. भाजप अध्यक्ष म्हणाले की, बंगालमधील या घटनांमध्ये जीव गमावलेल्या लोकांची संख्या आतापर्यंत 14 झाली आहे. भाजप प्रत्येक कार्यकर्त्यासोबत असल्याचे आम्ही येथे सांगत आहोत. आम्ही हा लढा बंगालच्या जनतेसाठी निर्णायक स्थितीपर्यंत लढत राहू.
Bengal Violence JP Nadda Says, Mamata’s hands stained with blood, one lakh people flee Bengal for fear of death
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App