Post Corona Effects : कोरोनापासून मुक्त झाल्यानंतर सुद्धा हृदयरोगाचा धोका , तपासणी करुन घ्या ; तज्ञांचा मौलिक सल्ला


वृत्तसंस्था

पुणे : कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर वेगवेगळे आरोग्याचे सल्ले डॉक्टर आणि तज्ञांकडून दिले जातात. त्यामध्ये कोरोनातून बरे झाल्यावर करावयाच्या चाचण्यांचा समावेश असतो. कोरोनाचा विषाणू तुम्हाला हृदयरोगी बनवू शकतो. त्यामुळे चाचणी करून घ्या असा सल्ला आता तज्ज्ञानी दिला. Post Corona Effects Risk of heart disease even after getting rid of corona

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोविड- 19 पासून बरे झाल्यानंतर अनेकांना हृदयाशी संबंधित समस्या येत आहेत. बर्‍याच रुग्णांमध्ये तसे दिसून आले आहे. हे टाळण्यासाठी नियमितपणे आरोग्य चाचणी करुं घेणे अत्यंत आवश्यक बनले आहे.

कोरोनापासून बरे झालेल्या 30 ते 50 वयोगटातील लोकांमध्ये हृदयाच्या समस्या वाढत आहेत. आरोग्य तज्ञांच्या मते, श्वास घेणे, छातीत दुखणे, हृदयविकाराचा झटका येणे, अचानक वेगवान किंवा मंद गतीने ठोके पडणे याचा समावेश आहे. त्याला शास्त्रीय भाषेत लॉंग कोविड, असे म्हणतात. म्हणजेच कोरोनातून बरे झाल्यानंतरही बर्‍याच दिवसांपर्यंत या आजाराची लक्षणे कोरोनामुक्त रूग्णांमध्ये दिसतात. कोरोनामधून बरे झालेल्या बर्‍याच रुग्णांना नंतर हृदयविकाराचा त्रास होतो आहे.

एका वृत्तानुसार, पोस्ट कोविड म्हणजेच कोविडनंतरही शरीरात जळजळ आणि रक्त जमा होण्याची समस्या निर्माण होते. ज्यामुळे रूग्णांमध्ये रक्त गुठळ्या होऊ शकतात.

पुण्याचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रमोद नरखेडे म्हणतात, “कोरोनाची लागण झाल्यानंतर 30 ते 50 वयोगटातील रूग्णांना फुफ्फुसातील संक्रमण आणि न्यूमोनियामुळे श्वसन संक्रमण आणि श्वासोच्छवासाची समस्या येते. परंतु खोकल्याची समस्या आणि श्वास लागणे ही हृदयरोगाशी संबंधित असू शकते.

नियमित हृदय तपासणी हवी

डॉ. नरखेडे म्हणतात की उच्च रक्तदाब आणि रक्त गोठल्याने हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि फुफ्फुसीय रक्तवाहिन्या संबंधी आजार, अशा गंभीर समस्या येत आहेत. त्यामुळे कोविडमधून बरे झाल्यानंतरही रूग्णांनी नियमितपणे हृदयाची तपासणी केली पाहिजे. त्यामुळे भविष्यातील आरोग्याच्या समस्या सुटतील.

Post Corona Effects Risk of heart disease even after getting rid of corona

बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात