Adv Gunratna Sadavarte Recieves Threat Calls : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बहुप्रतीक्षित मराठा आरक्षणावर निकाल दिला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राज्यातील बहुसंख्य मराठा समाज या निर्णयामुळे नाराज झाला आहे. आता आरक्षणविरोधी याचिका दाखल करणारे अॅड. जयश्री पाटील व गुणरत्न सदावर्ते या विधिज्ञ दांपत्याला जिवे मारण्याच्या धमक्या येत असून आमच्या जिवाला धोका असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. Adv Gunratna Sadavarte Recieves Threat Calls after maratha Reservation Verdict
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बहुप्रतीक्षित मराठा आरक्षणावर निकाल दिला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राज्यातील बहुसंख्य मराठा समाज या निर्णयामुळे नाराज झाला आहे. आता आरक्षणविरोधी याचिका दाखल करणारे अॅड. जयश्री पाटील व गुणरत्न सदावर्ते या विधिज्ञ दांपत्याला जिवे मारण्याच्या धमक्या येत असून आमच्या जिवाला धोका असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अॅड. जयश्री पाटील म्हणाल्या की, 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देणं चुकीचं असून घटनेतही तसं लिहिलेलं आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयानेही हे मान्य केले. मराठा आरक्षण कायदेशीर नव्हतं, पण काही पॉवरफूल नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं ते टिकणारं नव्हतं. निकाल आल्यापासून मला जिवे मारण्याची धमकी मिळत आहे. अश्लील शिवीगाळ केली जात आहे असं याचिकाकर्त्या जयश्री पाटील म्हणाल्या आहेत.
तर त्यांचे पती अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणल्यापासूनच सर्व आदेश रद्द झाले. आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. आरक्षणाचा लाभ घेऊन तहसीलदार, फौजदार होता येणार नाही. एसटी, एससी, ओबीसी यांना त्याचा लाभ होणार नाही. ५२ मोर्चांचा स्पष्ट पराभव आहे. माझ्या जीविताला काही झालं तर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि मराठा संघटना जबाबदार असतील. आम्हाला जे जे धमक्या देतायेत तेच जबाबदार असतील, असंही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
सदावर्ते पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायलयाने सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारला घटनेत बदल करण्याचा अधिकार नाही. आरक्षणाच्या घाणेरड्या राजकारणात शरद पवार उतरले. सामान्य विद्यार्थी बैचेन केले. आरक्षणासाठी घाणेरडं राजकारण केले गेले. मुघलाई पद्धतीने आरक्षण दिलं जाऊ शकत नाही हे सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केले आहे. कोणत्याही पद्धतीने ५० टक्के मर्यादा ओलांडली जाऊ शकत नाही हे घटनेत लिहिलं आहे. अशोक चव्हाण तुम्ही जातीचे मंत्री नाही तर राज्याचे मंत्री आहात. हे राज्य पाटिलकी, देशमुख यांचे राज्य नाही. डंके की चोट पर न्यायालयाने निकाल दिला आहे, असंदेखील सदावर्तेंनी म्हटलं आहे.
सदावर्ते पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणाचं समर्थन एकाही न्यायाधीशाने केलेलं नाही ही जमेची बाजूची आहे. न्या. गायकवाड यांच्या समितीचा रिपोर्ट मराठा समाजाला मागासवर्गीय सिद्ध करत नाही, म्हणून मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण मिळणार नाही, हे सांगितले आहे. मुंबई हायकोर्टाने ज्या पद्धतीने निकाल देताना टिप्पणी केली होती. त्याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टाने टिप्पणी केली आहे. मराठा आजही प्रभावशाली आहे. मागासवर्गीयांना जळताना लाकडं दिली जात नाही. अशा अत्याचारी लोकांना आरक्षण कसं दिलं जाऊ शकतं? मोर्चे काढून, मुख्यमंत्र्यांना वेठीस धरून आरक्षण मिळत नसतं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार आरक्षण मिळतं, असा टोलाही गुणरत्न सदावर्ते यांनी लगावला आहे.
Adv Gunratna Sadavarte Recieves Threat Calls after maratha Reservation Verdict
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App