Maratha Reservation : “राज्य सरकारनं नियोजित पद्धतीनं मराठा आरक्षणाचा खून केला”, नितेश राणेंची ठाकरे सरकारवर घणाघाती टीका

BJP MLA Nitesh Rane Takes A Dig At Thackeray Govt Over Maratha Reservation Verdict by SC

Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर आज निकाला दिला आहे. यानुसार मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास नाही. म्हणून त्यांना आरक्षित कॅटेगरीत गृहीत धरता येणार नाही, असे परखड मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले आहे. ५० टक्क्यांपेक्षाच्या वर आरक्षण मर्यादा नेण्यास सुप्रीम कोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू नीट न मांडल्यामुळे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे. BJP MLA Nitesh Rane Takes A Dig At Thackeray Govt Over Maratha Reservation Verdict by SC


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर आज निकाला दिला आहे. यानुसार मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास नाही. म्हणून त्यांना आरक्षित कॅटेगरीत गृहीत धरता येणार नाही, असे परखड मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले आहे. ५० टक्क्यांपेक्षाच्या वर आरक्षण मर्यादा नेण्यास सुप्रीम कोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू नीट न मांडल्यामुळे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे.

‘राज्य सरकारकडून नियोजित पद्धतीनं मराठा आरक्षणाचा खून’

आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर आमदार नितेश राणे म्हणाले की, ‘या महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण चा नियोजित पद्धतीने खून केला आहे. सरकार आल्यापासून ही ठरवून केलेली हत्या आहे.. कसली तयारी नाही.. फक्त नाटक आणि ढोंगीपणा.. शेवटी छ. शिवाजी महाराजांनी जे शिकवून ठेवले आहे.. तोंड वाजवून न्याय भेटत नसेल.. तर तोंडात वाजवून न्याय मिळवा!!’, अशी घणाघाती टीका राणेंनी केली आहे.

दरम्यान, न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्या. नागेश्वर राव, एस. अब्दुल नझीर, हेमंत गुप्ता आणि रविंद्र भट यांनी निकालाचं वाचन केलं. १०२वी घटनादुरुस्ती व राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना आणि ५० टक्क्यांवर आरक्षण देण्यात यावं की नाही, या दोन मुद्द्यांवर दाखल याचिकांवर हा निकाल देण्यात आला.

BJP MLA Nitesh Rane Takes A Dig At Thackeray Govt Over Maratha Reservation Verdict by SC

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात