Maratha Reservation Verdict : आरक्षण रद्द होताच मराठा संघटना आक्रमक; पुणे, सोलापूर, पंढरपूर, औरंगाबादेत निदर्शने

Maratha organization Protests After Maratha Reservation Verdict by SC in Pune, Solapur, Pandharpur, Aurangabad

Maratha Reservation Verdict :  सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक आरक्षण रद्द केले आहे. आरक्षणची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येत नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर विविध पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. राजकीय नेत्यांनी आरक्षण रद्द होणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर अनेक नेत्यांनी मराठा समाजाला भावनांचा उद्रेक न करता शांततेचं आवाहन केलं आहे. तरीही राज्यात काही ठिकाणी सर्वोच्च निकालानंतर तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. Maratha organization Protests After Maratha Reservation Verdict by SC in Pune, Solapur, Pandharpur, Aurangabad


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक आरक्षण रद्द केले आहे. आरक्षणची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येत नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर विविध पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. राजकीय नेत्यांनी आरक्षण रद्द होणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर अनेक नेत्यांनी मराठा समाजाला भावनांचा उद्रेक न करता शांततेचं आवाहन केलं आहे. तरीही राज्यात काही ठिकाणी सर्वोच्च निकालानंतर तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले.

पंढरपूर

Maratha organization Protests After Maratha Reservation Verdict by SC in Pune, Solapur, Pandharpur, Aurangabad

मराठा समाजास आरक्षणाची गरज नाही असं स्पष्ट करत सुप्रीम कोर्टानं आज देण्यात आलेले आरक्षण रद्द केले. या निर्णयाच्या विरोधात पंढरपुरातील मराठा समाज आक्रमक झाला असून पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधवांनी आंदोलन सुरू केलं. काही बांधवांनी अर्धनग्न होऊन सरकार विरोधात रोष व्यक्त करत सामूहिक मुंडण आंदोलनही केलं.

सोलापूर

Maratha organization Protests After Maratha Reservation Verdict by SC in Pune, Solapur, Pandharpur, Aurangabad

मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करण्याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिल्यावर त्याच्या निषेधार्थ सोलापुरातील काही मराठा समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, मात्र आंदोलनस्थळी पोहोचताच आंदोलनकर्त्यांना सोलापूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. तणाव वाढण्याची शक्यता घेऊन तेथे पोलीस बंदोबस्तही वाढवला.

पुणे

पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

औरंगाबाद

Maratha organization Protests After Maratha Reservation Verdict by SC in Pune, Solapur, Pandharpur, Aurangabad

आरक्षण रद्द होताच शहरातील मराठा संघटनेच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. सरकारच्या निषेधासाठी क्रांती चौकात कार्यकर्त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी भरउन्हात कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडले होते.

खासदार संभाजीराजेंकडून शांततेचं आवाहन

मराठा आरक्षणाच्या निकालावर बोलताना खासदार संभाजीराजे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यासाठी फडणवीस सरकारप्रमाणे ठाकरे सरकारनेही सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यामुळे कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मी आदर करतो. परंतु, आजचा दिवस मराठा समाजासाठी दुर्दैवी आहे. संपूर्ण देशाचं आणि महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावरील सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडली त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. न्यायालयाच्या या निर्णयानं मराठा समाजातून तीव्र नाराजीचा सूर आळवला गेला. पण, सद्य परिस्थिती पाहता न्यायालयानं दिलेल्या निकालाचा आदर करत समाजातील नागरिकांनी उद्रेकाची भाषाही करू नये, असं आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केलं आहे.

Maratha organization Protests After Maratha Reservation Verdict by SC in Pune, Solapur, Pandharpur, Aurangabad

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण