NCPA कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पगारात दरमहा 7,250 वाढ, वर्षाला₹50 हजार बोनस

विशेष प्रतिनिधी

मुंबई : नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) मधील कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी झालेल्या नव्या करारानुसार त्यांच्या पगारात दरमहा ₹7,250 ची वाढ होणार असून, वर्षाला ₹50 हजार बोनस मिळणार आहे. भाजप-प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या माध्यमातून हा वेतनवाढीचा करार करण्यात आला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष आणि अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली NCPA व्यवस्थापन आणि कामगार संघटनेदरम्यान हा करार झाला. या कराराची अंमलबजावणी 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2028 या चार वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ?

करारानुसार NCPA मधील सर्व कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात ₹7,250 ची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना दरवर्षी ₹50,000 बोनस मिळणार असल्याची माहिती रविंद्र चव्हाण यांनी दिली.

हा NCPA व्यवस्थापन आणि कामगार संघटनेदरम्यान झालेला तिसरा वेतनवाढ करार असल्याचेही सांगण्यात आले. कामगारांच्या वेतनवाढीसाठी अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात आले होते. त्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याचा दावा संघटनेने केला आहे.

NCPA मध्ये संघटनेचे वाढले बळ

यापूर्वी NCPA मध्ये मुंबई लेबर युनियन ही बहुसंख्य कामगारांची संघटना होती. मात्र, अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाने संघटनात्मक पातळीवर प्रभावी काम करत मुंबई लेबर युनियनचे संपूर्ण सदस्यत्व आपल्या संघटनेत आणल्याचे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

त्यानंतर औद्योगिक न्यायालयातील कायदेशीर प्रक्रियेतून अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ ही NCPA मधील सर्वात मोठी संघटना ठरल्याचा दावाही करण्यात आला आहे.

कराराच्या स्वाक्षरीवेळी कोण होते उपस्थित?

या ऐतिहासिक वेतनवाढ कराराच्या स्वाक्षरी समारंभाला NCPAच्या वतीने अध्यक्ष संटूक, संचालक फ्रेडी तलाठी, तांत्रिक संचालक काळे आणि मानव संसाधन विभागाचे व्हिन्सेंट डिसूझा उपस्थित होते. तर अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या वतीने सुहास माटे, प्रशांत वर्तक यांच्यासह संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

‘एकजूट आणि संघर्षाचा विजय’ : रविंद्र चव्हाण

करारानंतर रविंद्र चव्हाण यांनी या निर्णयाचे स्वागत केले. एकजूट, संघटनात्मक ताकद आणि कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी केलेल्या संघर्षाचा हा विजय आहे, असे त्यांनी म्हटले.

NCPA कर्मचाऱ्यांना मिळालेली ही वेतनवाढ भविष्यात अधिक चांगल्या सेवा-सुविधा आणि कामगार कल्याणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Great news for NCPA employees! A monthly salary hike of ₹7,250 and an annual bonus of ₹50,000.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात