बाळासाहेब असते तर मोदी-शहांची पाठ थोपटली असती!; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर महाप्रहार

विशेष प्रतिनिधी

ठाणे: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल विरोधकांनी जेव्हा जेव्हा पातळी सोडून अभद्र भाषा वापरली, तेव्हा तेव्हा जनता जनार्दनाने या विरोधकांना थेट खड्ड्यात घालण्याचे काम केले आहे. हिंदूुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचे आणि अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्याचे ऐतिहासिक स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पूर्ण केले. आज जर बाळासाहेब हयात असते, तर त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन शाब्बासकी दिली असती,” अशा अत्यंत तिखट शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या भूमीवरून विरोधी पक्षांची लक्तरे वेशीवर टांगली.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘लोकतंत्र बचाव यात्रे’मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी महायुतीच्या नेत्यांनी विरोधकांच्या देशविरोधी नरेटिव्हचा खरपूस समाचार घेतला.

हा श्रीलंका किंवा बांगलादेश नव्हे, शत्रूच्या घरात घुसणारा नवा भारत आहे!

देशातील लोकशाही आणि सुरक्षेवर भाष्य करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “भारतात बांगलादेश, श्रीलंका किंवा नेपाळसारखी अराजकता निर्माण होईल, अशी दिवास्वप्ने विरोधक रोज पाहत आहेत. मात्र त्यांनी एक गोष्ट डोक्यात फिट्ट बसवावी की, हा लाचार देश नसून शत्रूच्या घरात घुसून ठोकणारा नवा भारत आहे.”

सैन्याच्या शौर्यावर शंका घेणारे लाचार

“पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करत त्यांना गुडघ्यावर आणण्याचे ऐतिहासिक काम पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली लष्कराने केले. दुर्दैवाने आमचे दुटप्पी विरोधक स्वतःच्या राजकीय लाभासाठी भारतीय सैन्याच्या पराक्रमावर आणि शौर्यावरही संशय उपस्थित करत आहेत.”



सरन्यायाधीशांचा राजीनामा मागणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा थेट अपमान!

न्यायव्यवस्था आणि संविधानावर बोट ठेवणाऱ्या विरोधकांचा समाचार घेताना सभेत स्पष्ट करण्यात आले, “देशाच्या मुख्य न्यायाधीशांचा राजीनामा मागण्याचे धाडस विरोधक कसे काय करू शकतात? भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत दूरदृष्टी ठेवून देशातील स्वायत्त संस्थांची पायाभरणी केली आहे. सरन्यायाधीशांना लक्ष्य करणे आणि सर्वोच्च न्यायालयावर चाल करून जाणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संविधानाचा घोर अपमान आहे.”

संविधान चिरंतन राहील

“‘जब तक सूरज चांद रहेगा, तब तक भारत का संविधान रहेगा!’ पंतप्रधान मोदींच्या घरासमोर मोर्चे काढून देशात अशांतता माजवण्याचा विरोधकांचा कट देशातील 140 कोटी जनता कधीही यशस्वी होऊ देणार नाही.”

पंतप्रधानांचा बाप काढून केलेले पाप कुठे फेडाल?

काँग्रेस नेत्यांच्या पातळीहीन वक्तव्यांवरून जोरदार घणाघात करण्यात आला. “2011 मध्ये देशातील गरिबीचे प्रमाण 27 टक्के होते, ते ऐतिहासिकरीत्या घटून आता अवघ्या 2 टक्क्यांवर आले आहे. एकही दिवस सुट्टी न घेता अहोरात्र 24 तास देशासाठी राबणाऱ्या पंतप्रधानांच्या कामावर विरोधक जळत आहेत.”

शिव्यांची उलटी प्रतिक्रिया

“पंतप्रधानांचा बाप काढून विरोधकांनी जे महापाप केले आहे, ते फेडायला त्यांना जागा उरणार नाही. मोदींवर जितका चिखलफेक कराल, तितके तुम्ही स्वतःच राजकीय विजनवासात आणि खड्ड्यात जाल,” असा इशारा यावेळी देण्यात आला.

जगातील 36 देशांचे सर्वोच्च सन्मान मोदींना

भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर बोलताना विरोधकांच्या परदेश दौऱ्यांवर निशाणा साधण्यात आला. “पूर्वी भारताचे पंतप्रधान परदेशात गेल्यावर त्यांची साधी दखलही घेतली जात नव्हती. आज जगातील बलाढ्य अशा 36 देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान बहाल केला आहे. आज जगाच्या नकाशावर भारताचा डंका वाजत आहे.”

परदेशात जाऊन भारताची बदनामी

“हे जागतिक यश ज्यांना बघवत नाही, ते स्वतःच्या देशात सत्ता मिळत नाही म्हणून थेट परदेशात जाऊन आपल्याच देशाची, संविधानाची आणि पंतप्रधानांची बदनामी करत आहेत. हा थेट देशद्रोह आहे. ‘एकतर आम्ही सत्ता चालवू, नाहीतर देश उद्ध्वस्त करू’, अशी विकृत मानसिकता विरोधकांनी बाळगली आहे,” असा थेट आरोप या सभेतून करण्यात आला.

Eknath Shinde Slams Opposition Over Remarks on PM Narendra Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात