तपस्वी राजा श्री रामचंद्रानंतर योगी आदित्यनाथ, महाराज तुमचे राज्य चालू राहो, कंगना रनौटने दिल्या योगी आदित्यनाथ यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा

विशेष प्रतिनिधी

लखनौ: आमच्याकडे उत्तर प्रदेशचे एक तपस्वी राजा श्री रामचंद्र होते आणि आता आमच्याकडे योगी आदित्यनाथ आहेत. महाराज तुमचे राज्य चालू राहो, अशा शब्दांत प्रसिध्द अभिनेत्री कंगना रनौटने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.Yogi Adityanath after ascetic king Shri Ramchandra, Maharaj, may your kingdom continue, Kangana Ranaut wishes Yogi Adityanath for elections

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने शुक्रवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनौमध्ये भेट घेतली. तिच्या ‘तेजस’ या चित्रपटाचे शुटींग संपवून लखनऊला पोहोचलेल्या कंगनाने तिच्या चित्रपटाच्या टीमला पाठिंबा दिल्याबद्दल उत्तर प्रदेश राज्य सरकारचे आभार मानले.



कंगनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर योगी आदित्यनाथ यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. तिने म्हटले आहे की अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी वापरलेले एक नाणे योगी आदित्यनाथ यांनी तिला भेट दिले आहे.

किती अविस्मरणीय संध्याकाळ धन्यवाद महाराजजी असे म्हणत कंगनाने म्हटले आहे की, माननीय मुख्यमंत्री जी मला नाणे भेट देत होते जे रामजन्म भूमिपूजन मध्ये वापरले गेले होते. मी राम मंदिरावर अयोध्या नावाचा चित्रपट बनवत आहे. हा एक चांगला शगुन आहे.

Yogi Adityanath after ascetic king Shri Ramchandra, Maharaj, may your kingdom continue, Kangana Ranaut wishes Yogi Adityanath for elections

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात