गोकुळच्या निकालानंतर सतेज पाटील आक्रमक; हसन मुश्रीफांना काय म्हणाले?

Satej Patil

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर: आमचा जो विजय झालेला आहे, तो मुश्रीफ साहेबांनी आणि चंद्रदीप नरकेंनी खिलाडूवृत्तीने स्वीकारायला पाहिजे होता. जो पराभव झालेला आहे, तोही त्यांनी स्वीकारायला पाहिजे होता,’ असा टोला काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ आणि महायुतीच्या नेत्यांना लगावला आहे. Satej Patil

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनेलने 13 जागा जिंकत महायुतीला धक्का दिला. या निकालानंतर सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, फेरमतमोजणीच्या अर्जामुळे निकाल जाहीर होण्यास जवळपास 3 तासांचा विलंब झाल्याचेही त्यांनी सांगितले. गोकुळ ही कोल्हापूरची अस्मिता असून, त्याचे निर्णय कोल्हापुरातच झाले पाहिजेत, ही आमची भूमिका दूध उत्पादकांना पटली.


‘


कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी आम्हाला जे बहुमत दिले, त्याबद्दल साडेपाच लाख शेतकऱ्यांसह ठरावधारकांचे मी आभार मानतो. ही निवडणूक दूध उत्पादक आणि ठरावधारकांच्या माध्यमातून जिंकणार, असे आम्हाला वाटत होते. सर्वसामान्य लोकांनाही गोकुळमध्ये एकमुखी कारभार असावा, असे वाटत होते. तोच कौल आम्हाला मिळाला आहे,’ असे सतेज पाटील म्हणाले.

ज्यांचा पराभव झाला होता, त्यांनी तो स्पोर्टिंगली घ्यायला पाहिजे होता. दोन्ही उमेदवारांनी फेरमतमोजणीचा अर्ज केला. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियमाप्रमाणे निर्णय घेतला. मतमोजणीच्या वेळी बाद झालेली मते बाजूला काढण्यात आली होती. आमच्या आणि त्यांच्या प्रतिनिधींनीही ती बाद असल्याचे मान्य केले होते. त्यानंतर उर्वरित मतमोजणी झाली. फेरमतमोजणीसाठी कायद्याला धरून वैध कारण नसल्यामुळे त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले. मुश्रीफ साहेबांनी आणि चंद्रदीप नरकेंनी हा अर्ज द्यायला नको होता. आमचा झालेला विजय त्यांनी खिलाडूवृत्तीने स्वीकारायला हवा होता. त्यांच्या अर्जामुळे जवळपास 3 तास गेले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आलेल्या अर्जावर कायदेशीर विचार करून निर्णय घेणे अपेक्षित असते. त्यांनी त्याप्रमाणे निर्णय घेतला. त्यामुळे मी त्यांना दोष देत बसणार नाही, असे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.

Our victory should have been accepted in sporting spirit,’ Satej Patil takes dig at Hasan Mushrif

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात