नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय नौदल भरती


 

विषेश प्रतिनिधी

दिल्ली : भारतीय नौदलामध्ये 10 + 2 (B.Tech) कॅडेट प्रवेश योजना लवकरच सुरू होत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.joinindiannavy.gov.in/ द्वारे 10 ऑक्टोबर रोजी किंवा त्यापूर्वी भरतीसाठी अर्ज करू शकतात.

भारतीय नौदलात एकूण 35 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. शिक्षण शाखेची 5 पदे आणि कार्यकारी आणि तांत्रिक शाखांची 30 अश्या एकूण 35 जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया असेल.

Hurry Up! India navy has  jobs for you

JEE Main – 2021(B.E. / B.Tech) परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना NTA ने प्रकाशित केलेल्या JEE Main – 2021 परीक्षेतील ऑल इंडिया रँक नुसार सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड विद्यार्थ्यांची निवड करेल. फायनल मेरिट लिस्ट ही SSB मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे बनवली जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी खालील पात्रता तपासून घ्याव्यात :

  • उमेदवार निदान 12 ची परीक्षा उत्तीर्ण असावेत किंवा
  • भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिता यापैकी कोणत्याही एक शाखेतून किमान 70 % एकूण गुणांसह 12 वी परीक्षा उत्तीर्ण असावे.
  • 10 वी किंवा 12 वी परीक्षा इंग्रजी या विषयात किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.

शिक्षण शाखा किंवा कार्यकारी आणि तांत्रिक शाखेतील पदांच्या भरतीसाठी उमेदवारांचा जन्म 2 जुलै 2002 ते 1 जानेवारी 2005 दरम्यानचा असावा. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.


8th edition of annual Indian-Sri Lanka Navy bilateral maritime exercise SLINEX-20 to begin


भारतीय नौदलात भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 1 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान अधिकृत वेबसाइट https://www.joinindiannavy.gov.in/द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी त्यांची पात्रता तपासली पाहिजे. याशिवाय भारतीय नौदलाने विविध शाखांमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड ऑफिसरच्या 181 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार इंडियन नेव्ही एसएससी ऑफिसर भरती 2021 साठी अधिकृत वेबसाईटhttps://www.joinindiannavy.gov.in/ वर 5 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. 21 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

Hurry Up! India navy has  jobs for you

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण