अजून निर्णयच नाही, पण माध्यमांची आधीच घाई; टाटा समूहाला एअर इंडियासाठी करावी लागणार प्रतीक्षा, केंद्राने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

Governments clarification on Air India handover to Tata Group, know what it said center

Governments clarification on Air India : सरकारी विमान कंपनी एअर इंडिया टाटा समूहाच्या नियंत्रणाखाली जात असल्याच्या बातम्या आज माध्यमांमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सुरू आहेत. पण यादरम्यान सरकारने स्पष्ट केले की, अद्याप यावर निर्णय झालेला नाही आणि जेव्हा होईल तेव्हा माहिती दिली जाईल. Governments clarification on Air India handover to Tata Group, know what it said center


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सरकारी विमान कंपनी एअर इंडिया टाटा समूहाच्या नियंत्रणाखाली जात असल्याच्या बातम्या आज माध्यमांमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सुरू आहेत. पण यादरम्यान सरकारने स्पष्ट केले की, अद्याप यावर निर्णय झालेला नाही आणि जेव्हा होईल तेव्हा माहिती दिली जाईल.

टाटा ग्रुपने आणि स्पाइसजेटचे अजय सिंग यांनी एअर इंडियासाठी बोली लावली होती. ही दुसरी वेळ आहे जेव्हा सरकार एअर इंडियामधील आपला हिस्सा विकण्याचा प्रयत्न करत आहे. याआधी 2018 मध्ये सरकारने कंपनीतील 76 टक्के हिस्सा विकण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

काय म्हटले सरकारने?

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या (डीआयपीएएम) सचिवांनी ट्वीट केले की, “सरकारने एअर इंडियाच्या आर्थिक बोलीला मान्यता दिल्याच्या माध्यमांतील बातम्या चुकीच्या आहेत. सरकार जेव्हाही हा निर्णय घेईल, तेव्हा माध्यमांना याची माहिती दिली जाईल.”

डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल प्रक्रिया

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एअर इंडियाची निर्गुंतवणूक प्रक्रिया डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सरकारने एअर इंडियासाठी आर्थिक निविदा मागवल्या होत्या. हा सरकारच्या निर्गुंतवणूक कार्यक्रमाचाही एक भाग आहे. सरकार एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसमधील आपला 100 टक्के हिस्सा विकणार आहे, तर ग्राउंड हँडलिंग कंपनी AISATS मध्ये 50 टक्के हिस्सा विकणार आहे.

एअर इंडियाची टाटा समूहाकडूनच सुरुवात

एअर इंडियाची सुरुवात 1932 मध्ये टाटा समूहानेच केली होती. टाटा समूहाचे जे.आर.डी. टाटा यांनीच या विमान कंपनीची सुरुवात केली होती, ते स्वतःसुद्धा एक अतिशय कुशल पायलट होते.

एअर इंडिया अशी बनली सरकारी कंपनी

दुसऱ्या महायुद्धानंतर, सामान्य हवाई सेवा भारतापासून सुरू झाली आणि नंतर ती एअर इंडिया असे नाव देऊन सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी बनली. 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रीय विमानसेवेची गरज जाणवली आणि भारत सरकारने एअर इंडियामध्ये 49% हिस्सा विकत घेतला. यानंतर, 1953 मध्ये भारत सरकारने एअर कॉर्पोरेशन कायदा पास केला आणि टाटा समूहाकडून कंपनीतील बहुसंख्य भाग खरेदी केला. अशा प्रकारे एअर इंडिया पूर्णपणे सरकारी कंपनी बनली.

Governments clarification on Air India handover to Tata Group, know what it said center

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण