अमित ठाकरे यांचा मुंबईच्या खड्डयांमुळे लोकलचा प्रवास मुंबईतील खड्डे बुजविण्यात शिवसेनेला अपयश


वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईत चांगले रस्ते बांधणं हे काही रॉकेट सायन्स नाही. गेली २५ वर्ष शिवसेनेची सत्ता पालिकेत असून त्यांना हे का जमत नाही? असा सवाल मनसेचे नेते अमित ठाकरे केला आहे. आज रस्त्यावरील खड्ड्याना त्रासून चक्क कल्याण डोंबविलीला जाण्यासाठी लोकलने प्रवास सुरु केला आहे. दादर तेथून त्यांनी प्रवासास सुरुवात केली.Amit Thackeray’s Mumbai Local travel due to potholes

मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन अमित ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका केली. अमित ठाकरे यांनी आज खराब रस्त्यामुळे कल्याण-डोंबिवली, असा प्रवास लोकलने केला. असा प्रवास करून त्यांनी खड्ड्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच परिस्थितीची जाणीव त्यांनी सत्ताधाऱ्यांना करून दिली आहे. 

याबाबत अमित ठाकरे म्हणाले, राजसाहेबांकडे इच्छाशक्तीमुळे नाशिकमध्ये चांगले रस्ते बांधले गेले. तिथल्या रस्त्यावर एकही खड्डा नाही. मग गेली २५ वर्ष मुंबईची सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांना हे का जमत नाही? जोपर्यंत हे लोक सत्तेत आहेत तोपर्यंत आपले रस्ते सुधारणारच नाहीत, असे अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तसेच ठेकेदरांनी तुम्हाला न सांगता रस्ते बांधतात का? काम देताना ठेकेदारांकडे पाहिलं जात नाही का? फक्त कारवाई करू असे सांगितलं जातं. लोकांचे जीव जातायेत. एक वडील त्यांचा मुलगा खड्ड्यात पडून मृत्यू झाला म्हणून ते खड्डे बुजवत फिरतात. जोपर्यंत हे सत्तेत आहेत तोपर्यंत काही होणार नाही.

रस्त्याने जाऊन वेळ घालवण्यापेक्षा लोकलनं प्रवास केला. नाशिकमध्ये रस्ते चांगले मग इतर ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था का? कारवाई करण्याचं नाटक केवळ लोकांना दाखवण्यापुरतंच आहे असंही अमित ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली.

  •  चांगले रस्ते बांधण्यासाठी रॉकेट सायन्स लागत नाही
  • कल्याण – डोंबवलीसाठी लोकल प्रवास सुरुवात
  •  मुंबईतील खड्ड्याना अमित ठाकरे वैतागले
  • जनतेच्या त्रासाला फोडले तोंड
  •  शिवसेनेची २५ वर्षे सत्तेत, खड्डे बुजविण्यात अपयश- नाशिकमध्ये रस्ते चांगले, मग मुंबईत का नाहीत

Amit Thackeray’s Mumbai Local travel due to potholes

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय