वृत्तसंस्था
मुंबई : हिंदू दफनभूमीचा भाग मुस्लिमांना देण्याचा घाट घातल्यामुळे कल्याण डोंबिवलीतील रहिवासी आक्रमक झाले असून पालिकेच्या पाहणी पथकाला त्यांनी हाकलून दिले आहे. Part of a Hindu cemetery to be given to Muslims; kalyan dombivili residents angry
गेले काही महिन्या पासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरात राहणाऱ्या मुस्लिम नागरिकांनी दफनभूमीची मागणी करून आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर नंतर महानगरपालिकेने मुस्लिम बांधवांसाठी दफनभूमीची जागा शोधण्यास सुरुवात केली. कल्याण डोंबिवलीतील विविध दफनभूमी व आरक्षित जागेची पाहणी केली जात आहे.
अशाच प्रकारे काल डोंबिवली येथील देवीचा पाडा परिसरात आरक्षण क्र. 309 C.G. या भूखंडावर असलेल्या दफनभूमी जी गेल्या शेकडो वर्षांपासून हिंदूंची वहिवाट आहे तेथे 12-15 वयोगटातील मुलाचा याच दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. या ठिकाणी पालिका कर्मचारी पाहणीसह मोजमाप करण्यात येत असल्याचे कळताच शेकडोंच्या संख्येने रहिवाश्यांसह ग्रामस्थांनी पथकाला गराडा घातला.
केडीएमसीच्या पथकाला हाकलून लावले व शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही स्मशानभूमी ज्यांच्यासाठी आरक्षित आहे त्यांनाच वापरू द्यावे इतर जातीचं आरक्षण याठिकाणी टाकू नये. अन्यथा उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. पालिका आयुक्तांना निवेदन दिले .यावेळी पोलिस पाटील लक्ष्मीकांत भोईर, गोरखनाथ म्हात्रे, विजय भोईर, अनिल भोईर, कुणाल म्हात्रे, समीर भोईर, विकी म्हात्रे हे ग्रामस्थ देखील उपस्थित होते.
– संतप्त रहिवाशांनी केडीएमसी पथकाला हाकलले
– मुस्लिम लोकांना स्वतंत्र अन्यत्र जागा देण्याची मागणी
– हिंदूंच्या वहिवाट असलेल्या जागा का देता ?
– रहिवाशांचा महानगरपालिकेला सवाल
– केडीएमसीच्या पाहणी पथकाला पिटाळले
– उग्र आंदोलनाचा इशारा, निवेदनही दिले
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App