सरकारला प्रश्न तर विचारायचे पण संसद चालू द्यायची नाही विरोधकांची दुहेरी रणनीती


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पेगासस महागाई कृषी कायदे शेतकरी आंदोलन या विषयांवर केंद्र सरकारवर प्रश्नांचा भडिमार करायचा पण संसद न चालू देऊन सरकारला उत्तरे देण्याची संधी द्यायची नाही, अशी दुहेरी रणनीती विरोधी पक्षांनी अवलंबले आहे. काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी सर्व विरोधी पक्षांचे यामध्ये नेतृत्व स्वीकारल्याचे दिसते.

देशात आणि जगभर गाजत असलेल्या पेगॅसस प्रोजेक्ट प्रकरणावरून काँग्रेस आणि समविचारी पक्ष सरकारची संसदेच्या दोन्ही सभागृहात कोंडी करत आहेत. There are indications that the Congress and other opposition parties are embroiled in controversy in both the Houses of Parliament over the Pegasus project scandal that is raging in the country and around the world.

राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात सरकारला पेगॅसस प्रकरणी घेरण्यासाठी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेसचे नेते राहुल गांधीही उपस्थित होते. राहुल गांधीच्या नेतृत्वात होणाऱ्या या बैठकीला प्रथमच शिवसेना देखील सहभागी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. डाव्या पक्षांसह अनेक विरोधी पक्षाचे नेते बैठकीमध्ये सहभागी झाले होते.

कालच भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसद न चालण्याच्या विषयावर नाराजी जाहीर केली होती. तसेच आज देखील संसदेचे कामकाज चालण्याचे चिन्ह कमीच दिसत आहेत.

विरोधी पक्षाच्या बैठकीसोबतच भाजप नेत्यांची बैठक देखील पार पडली. यात विरोधाच्या काउंटर करण्याची तयार केली गेली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर नेते हजर होते.

There are indications that the Congress and other opposition parties are embroiled in controversy in both the Houses of Parliament over the Pegasus project scandal that is raging in the country and around the world.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण