वृत्तसंस्था
उस्मानाबाद : भूम येथील उपविभागीय अधिकारी मनिषा राशिनकर यांच्यासह एकाला उस्मानाबाद येथील लाचलुचपत विभागाने मंगळवारी अटक केली. परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील वाळू वाहतूक करणाऱ्या विक्रेत्याकडे वाळूचा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी पैशाची मागणी केली होती. एक लाख १० हजार रुपयांची दरमहा हप्तारुपी लाच घेताना त्यांना अटक केली आहे. ACB arrested Osmanabad Bhum Senior Lady Officer in Revenue Department red handed while receiving bribe
उस्मानाबाद लाचलुचपत विभागाच्या या कारवाईत महसूल विभागाचा एक वरिष्ठ दर्जाचा एक मोठा अधिकारी जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध वाळू व्यवसाय तेजीत सुरू असून अधिकारी यांना दरमहा लाखो रुपयांची लाच द्यावी लागते हे या घटनेवरून पुन्हा समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
भूम येथील उपविभागीय अधिकारी मनिषा राशीनकर यांच्यासह एका कोतवालास १ लाख १०हजाराच्या लाच प्रकरणी अटक झाली आहे. वाळू व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दरमहा लाच मागितल्याचा आरोप आहे. मनिषा अरुण राशिनकर आणि कोतवाल विलास नरसिंग जानकर अशी आरोपींची नावं आहेत. १ लाख १० हजार रुपयांची मागणी करून तडजोडी अंती ९० हजार आणि १० हजार आरोपी जानकरने स्वीकारले.
भुम येथे गुन्हा दाखल
तक्रारदार यांचा एक टीप्पर आणि त्यांच्या पाहुण्यांचा जेसीबी आणि तीन ट्रॅक्टर हे विना कारवाई वाळू वाहतुकीसाठी चालू देण्यासाठी लाच घेतली असून पोलिस ठाणे भुम येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रभर चालू होती. सापळा अधिकारी प्रशांत संपते, पोलिस उप अधीक्षक, ला. प्र. वि. उस्मानाबाद यांनी डॉ. राहुल खाडे, पोलिस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद ब्रम्हदेव गावडे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. या पथकात पोलिस निरीक्षक गौरिशंकर पाबळे, अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, विशाल डोके यांचा समावेश होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App