संसदेत विरोधकांच्या एकजुटीसाठी राहुल गांधी यांचा पुढाकार; मात्र गदारोळाच्या प्रवृत्तीत बदल नाही


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : 2024 चा लोकसभा निवडणुकांसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या विरोधकांची मोट बांधण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न करत असताना काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी संसदेत विरोधकांच्या एकजुटीसाठी पुढाकार घेतला आहे.  Rahul Gandhi’s initiative for unity of opposition in Parliament; But that is not all

त्यांनी आज सर्व विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची सुमारे दीड तास बैठक घेऊन संसदेतले विरोधकांचे धोरण ठरविले. महागाई, पेगासस, कृषी कायदे, शेतकरी आंदोलन या प्रत्येक मुद्द्यावर सर्व विरोधकांची एकजूट आहे. विरोधकांना संसदेत या विषयांवर चर्चा करायची आहे. सरकारकडून आम्हाला उत्तरे हवी आहेत, असे राहुल गांधी यांनी विरोधी नेत्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

या बैठकीला काँग्रेसचे राज्य भेटले नेते आणि विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतले नेते अधीर रंजन चौधरी, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, द्रमुकचे नेते टी आर बालू, शिवसेना खासदार संजय राऊत तसेच डाव्या पक्षांचे खासदार उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना पाठिंबा दर्शविला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर संसद चालू न देण्याचा आरोप केला आहे. त्याला राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे संसदेत आम्हाला महागाई, पेगासस, कृषी कायदे, शेतकरी आंदोलन या विषयांवर चर्चा करायची आहे. सरकारने या प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित आहे असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

मात्र, राहुल गांधी यांनी एवढे सांगूनही संसदेत विरोधकांची वर्तणूक बदललेली नाही. राज्य सभेत त्यांनी सुरुवातीपासूनच गोंधळ घालून आत्ताचे कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित करायला लावले. विरोधी खासदारांच्या गटाने एकाच प्रकारच्या स्थगन प्रस्तावाच्या नोटिसा दोन्ही सभागृहात दिल्या आहेत.

Rahul Gandhi’s initiative for unity of opposition in Parliament; But that is not all

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात