केरळ होतोय वेगाने म्हातारा, २० टक्केंहून अधिक जनता ज्येष्ठ नागरिक


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केरळ हे राज्य सर्वाधिक वेगाने म्हातारे होत आहे. येथील ज्येष्ठ नागरिकांची संख्या २० टक्याहून अधिक झाली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची देखभाल करण्याची मोठी जबाबदारी या राज्यावर येऊन पडली आहे.Kerala is rapidly aging, more than 20% of the population is senior citizens

देशातील इतर राज्यांपेक्षा केरळमधील ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. साठ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांची संख्या २०११ च्या जनसंख्येनुसार १३ टक्के होती. २०३६ मध्ये हे प्रमाण २३ टक्यांवर जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक पाचवा नागरिक हा ज्येष्ठ नागरिक असल्याची शक्यता केरळच्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर व विकास संस्थेचे अध्यक्ष एस एस इरुदय राजन यांनी व्यक्त केली आहे.



जननदर कमी होणे आणि दीर्घायुष्यी लोकांचे प्रमाण वाढणे यामुळे केरळच्या डेमोग्राफीमध्ये बदल होत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या संख्येचा प्रश्न सोडविण्यासाठी दीर्घकालीन योजनेची गरज असल्याचे मत डॉ. राजन यांनी व्यक्त केले आहे.

त्जज्ञांच्या मतानुसार, सरकारी आणि स्वयंसेवी संस्थांनी ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणकारी योजनांसाठी तयारी करणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचे तसेच सामाजिक आणि आर्थिक प्रश्न निर्माण होणार आहेत. त्यासाठी सर्वंकष येजना तयार करायला हवी. त्याचबरोबर जीवनमान उंचावण्यासाठी नागरिकांची मानसिकता तयार करायला हवी.

डॉ. राजन म्हणाले, २०४१ मध्ये २८.२ टक्के तर २०५१ मध्ये ३४.३ टक्के होण्याची शक्यता आहे. लोकांनी आता मान्य करायला हवे की केरळ वेगाने म्हातारा होत आहे. वृध्दत्व हे दुसरे बालपण असते. त्यामुळे त्यादृष्टीने आता तयारी करायला हवी.

केरळमध्ये देशातील सर्वात कमी बालमृत्यू दर असण्याची शक्यता आहे. जननदर मात्र १.८२ वरून १.८ होण्याची शक्यता आहे. केरळमधील स्त्री-पुरुष गुणोत्तरही कमी होणा आहे. सध्या दर हजार पुरुषांमागे १,०८४ स्त्रिया आहेत. हेच प्रमाण २०३६ मध्ये किंचित कमी होऊन १,०७९ होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये लोकसंख्या वाढीचा वेगही देशात सर्वात कमी आहे.

Kerala is rapidly aging, more than 20% of the population is senior citizens

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”