वृत्तसंस्था
बंगळुरू : मी बसवराज बोम्मई शपथ घेतो की…; अशी शपथ कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घेतली. कालच त्यांची विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड झाली होती.Basavaraj Bommai is Ruler of Karnataka; The swearing-in ceremony as Chiefminister
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून चर्चा सुरु होती. त्यावर आज अखेर पडदा पडला. बी. एस. येडियुरप्पा यांनी स्वेच्छेने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार ? ,यावरून अटकळी बांधल्या जात होत्या. अखेर बसवराज बोम्मई यांनी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
बसवराज बोम्मई यांनी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी त्यांना शपथ दिली. शपथविधी दरम्यान माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा उपस्थित होते. या बरोबरच भाजपाचे इतर अनेक बडे केंद्रीय व राज्य ज्येष्ठ नेतेही या कार्यक्रमात उपस्थित होते. बोम्मई कर्नाटकचे २३ वे मुख्यमंत्री असणार आहेत.
कोण आहेत बसवराज बोम्मई?
येडियुरप्पांप्रमाणेच बसवराज बोम्मई हे देखील लिंगायत समाजाचे नेते असून ते येडियुरप्पांचेच निकटवर्तीय मानले जातात. ६१ वर्षीय बसवराज बोम्मई यांनी गृहविभाग, कायदे विभाग, सांस्कृतिक कार्यमंत्रीपद अशा महत्त्वाच्या पदांची जबाबदारी पार पाडली.
मंगळवारी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी बोम्मई यांनी भाजपाचे केंद्रीय निरीक्षक धर्मेंद्र प्रधान, जी. किशन रेड्डी आणि अर्जुन सिंह यांची बंगळुरूमध्ये भेट घेतली. याशिवाय, त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी पक्षाच्या ४० आमदारांनी देखील त्यांची भेट घेतल्याचे सांगितलं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App