पेगासिस हेरगिरीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, ज्येष्ठ पत्रकार एन. राम , शशि कुमार यांची याचिका

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पेगासिस स्पायवेअर कथित हेरगिरीप्रकरणी ज्येष्ठ पत्रकार एन. राम आणि शशि कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नेत्यांसह पत्रकार आणि प्रतिष्ठित नागरिकांची हेरगिरी केल्याच्या प्रकरणाची दखल घेऊन न्यायालयाने विद्यमान किंवा सेवानिवृत्त न्यायाधिशाच्या देखरेखीखाली स्वतंत्रपणे चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.The Pegasus case should be investigated under the supervision of the Supreme Court, senior journalist N. Petition of Ram, Shashi Kumar

या याचिकेवर येत्या काही दिवसांत सुनावणी होणार आहे.याचिकेमध्ये म्हटले आहे की पेगासिस स्पायवेअरच्या मदतीने मोबाईल हॅक करून यंत्रणांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केला आहे. त्यामुळे केंद्राने किंवा कोणा सरकारी यंत्रणणेने पेगासिस स्पायवेअरचा वापर करण्यासाठी परवानाग घेतला होता का?याबाबतही सरकारने भाष्य करो अशी मागणी करण्यात आली आहे. जगातील अनेक प्रमुख माध्यम संस्थांनी केलेल्या चौकशी पत्रकार, वकील, मंत्री, विरोधी पक्षनेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह १४२ हून अधिक भारतीय नागरिकांची हेरगिरी करण्यात आल्याचेही म्हटले आहे.

याचिकेमध्ये म्हटले आहे की सिक्युरिटी लॅब ऑफ अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या नेतृत्वाखाली हेरगिरीसाठी लक्ष्य करण्यात आलेल्या अनेक व्यक्तींच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली. या मोबाईलमध्ये पेगासिसच्या सहाय्याने हेरगिरी केल्याचे उघड झाले आहे.

लष्करी उपयोगासाठीच्या स्पायवेअरचा उपयोग करून हेरगिरी करणे हे वैयक्तिक स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. भारतीय घटनेच्या कलम १४ (कायद्याने समानता), कलम १९ (भाषण आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य) आणि कलम २१ (जगण्याचा अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्य) यांना सर्वोच्च न्यायालयाने मुलभूत अधिकार मानले आहेत. पत्रकार, डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते, मंत्री आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन हॅक करणे म्हणजे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मुलभूत अधिकारावरच घाला आहे.

The Pegasus case should be investigated under the supervision of the  Supreme Court,enior journalist N. Petition of Ram, Shashi Kumar

महत्त्वाच्या बातम्या