वृत्तसंस्था
नवी दिल्ली : लसीकरणाच्या बाबतीत भारताने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे .लहान मुलांसाठी कोरोनाची लस पुढील महिन्यात बाजारात येणार आहे. देशाचे आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी याबद्दल माहिती दिली .ते भाजपच्या संसदीय कार्यकारणीच्या बैठकीत बोलत होते.Good News: Corona vaccine available for children from next month: Health Minister Mansukh Mandviya
पंतप्रधान मोदी देखील या बैठकीला हजर होते. मागच्या आठवड्यात एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीच्या चाचण्या लहान मुलांवर सुरु असून सप्टेंबरपर्यंत याचे परिणाम समोर येतील अशी माहिती दिली होती. सध्या दिल्लीच्या एम्स रुग्णालयात २ ते ६ वयोगटातील मुलांवर कोवॅक्सिन लसीची चाचणी सुरु आहे.
७ जूनला दिल्लीत लहान मुलांवर कोरोना लसीच्या चाचणीला सुरुवात झाली. त्याआधी DGCI ने भारत बायोटेक कंपनीला कोवॅक्सिन लसीची चाचणी मुलांवर घेण्यासाठी परवानगी दिली होती. दिल्लीत तब्बल १७५ विविध गटातील लहान मुलांना ही लस देण्यात आली असून दुसरा डोस पूर्ण झाल्यानंतर या लसीचे परिणाम जाहीर केले जाणार आहेत.
दिल्लीव्यतिरीक्त भारतात आणखी ३ ठिकाणी लहान मुलांवर लसीच्या चाचण्या सुरु असून महाराष्ट्रातील नागपूरमध्येही ही चाचणी सुरु आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App