विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. पावसाचा तडाखा बसलेल्या चिपळूण आणि महाडमधील दरडग्रस्त तळीये गावाचा त्यांनी दौरा केला. पावसामुळे झालेल्या नुकसानीची कोश्यारी यांनी पाहणी केली. यावेळी कोकणातील चित्र विदारक असल्याचं सांगत या परिस्थितीत कोणतंही राजकारण केलं जाणार नाही. केंद्राकडून नक्की मदत मिळेल, असं राज्यपाल कोश्यारी म्हणाले.Maharashtra Flood : Governor Bhagat Singh Koshyari’s visit to flood-hit areas: Criticism on Ashish Shelar! What did Sharad Pawar say?
चिपळूण बाजार पेठेत पुरग्रस्त भागात व्यापारी, नागरिकांशी मा. @maha_governor @BSKoshyari जी आणि आम्ही संवाद साधला, तेथील नुकसानीची पाहणी केली! pic.twitter.com/poJcOUWtt2 — ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) July 27, 2021
चिपळूण बाजार पेठेत पुरग्रस्त भागात व्यापारी, नागरिकांशी मा. @maha_governor @BSKoshyari जी आणि आम्ही संवाद साधला, तेथील नुकसानीची पाहणी केली! pic.twitter.com/poJcOUWtt2
— ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) July 27, 2021
जर कुणाला घेऊन जायचं होतं तर सरकारमधल्या एखाद्या व्यक्तीला का घेऊन गेले नाहीत राज्यपाल?
राजभवनाने राज्यपालांच्या दौऱ्याचा राज्यपालांनी दौऱ्यावर जात असताना आणि पूरग्रस्त भागांची माहिती आणि तेथील आढावा घेत असताना सरकारमधल्या एखाद्या मंत्र्याला किंवा अधिकाऱ्याला घेऊन जाणं अपेक्षित होतं त्यांनी तसं का केलं नाही असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातो आहे.
शरद पवार यांनी काय म्हटलं ?
राज्यपालांच्या दौऱ्याबाबत आणि त्यांच्यासोबत असलेल्या आशिष शेलारांबाबत जेव्हा शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा शरद पवार म्हणाले की, ‘राज्यपालांना ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांना ते घेऊन गेले, शेलारांवर त्यांचा विश्वास असेल. राज्यपाल दौरा करत आहेत त्यातून ते केंद्राकडून मदत आणतील अशी अपेक्षा आहे.’
पूरपरिस्थिती पाहून दु:ख होतंय, राजकारण केलं जाणार नाही, केंद्राकडून मदत नक्की केली जाईल.असं आश्वासन यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी दिलं .
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी 12 जिल्हे पूरग्रस्त झाले. तळये गावात तर आत्तापर्यंत 80 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more