वृत्तसंस्था
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पुर ग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने 700 कोटी रुपयांची मदत जाहीर केली.कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली.Modi government announced 700cr for flood affected farmers of Maharashtra
केंद्राने पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जवळपास 700 कोटी मंजूर केले असल्याची माहिती नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली. राज्यात काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका हा राज्यातील शेतीलाही बसला आहे.
पुराचे शेतात घुसल्याने प्रवाहाच्या वेगात ही पिकेही वाहून गेली आहेत तर काही ठिकाणी पाणी साचून राहिल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची दखल मोदी सरकारने घेतली आहे, असे ते म्हणाले.
विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातल्याने कामकाज थांबवावे लागले होते. सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांना वारंवार कार्यवाहीत सहभागी होण्याचे आवाहन केले पण प्रश्नोत्तराचा तास अनेक वेळा तहकूब करावा लागला. त्यानंतर पुन्हा ४ वाजता सभागृहाचे कामकाज सुरु करण्यात आलं.
सभापतींना मध्यस्थी करण्यास भाग पाडले म्हणून विरोधकांनी आंदोलन सुरू केले. “कृपया आपल्या जागांवर परत या आणि कामकाजात भाग घ्या. आपण सरकारला आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे विचारू शकता. कृपया सहकार्य करा,” अशी बिर्ला वारंवार विनंत्या करत होते.
या गोंधळाच्या परिस्थितीत तोमर यांनी महाराष्ट्रात आलेल्या पुराबद्दल भाष्य केले. ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आणि हजारो कुटुंबांचे नुकसान झाले आहे. “आम्हाला नुकत्याच आलेल्या पूरामुळे, विशेषत: शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा सखोल अहवाल मिळाला आणि त्याचे विश्लेषण केले आहे. गृह मंत्रालयाने 700 कोटी रुपये मदत म्हणून मंजूर केले आहे, असे तोमर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App