Know Everything About Pegasus Spyware, How it Works in Marathi

Pegasus Spyware : काय आहे पेगासिस स्पायवेअर, कसे हॅक केले जातात फोन? कुणी बनवले हे स्पायवेअर? वाचा सविस्तर…

Pegasus Spyware : 2019 मध्ये राज्यसभेत ज्यावरून गदारोळ झाला होता ते पेगासस स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ‘द वायर’ या न्यूज पोर्टलने दावा केला आहे की, भारत सरकारने 2017 ते 2019 पर्यंत सुमारे 300 भारतीयांची हेरगिरी केली आहे. या लोकांमध्ये पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते, विरोधी पक्षातील नेते आणि व्यापारी यांचा समावेश आहे. सरकारने पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून या लोकांचे फोन हॅक केले. या दाव्यानंतर सरकारने सर्व आरोप निराधार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. Know Everything About Pegasus Spyware, How it Works in Marathi


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 2019 मध्ये राज्यसभेत ज्यावरून गदारोळ झाला होता ते पेगासस स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ‘द वायर’ या न्यूज पोर्टलने दावा केला आहे की, भारत सरकारने 2017 ते 2019 पर्यंत सुमारे 300 भारतीयांची हेरगिरी केली आहे. या लोकांमध्ये पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते, विरोधी पक्षातील नेते आणि व्यापारी यांचा समावेश आहे. सरकारने पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून या लोकांचे फोन हॅक केले. या दाव्यानंतर सरकारने सर्व आरोप निराधार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

पेगासस यापूर्वीही अनेकदा चर्चेत आले आहे. 2019 मध्ये व्हाट्सएपने पेगासस बनविणार्‍या कंपनीवर दावाही दाखल केला होता. या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर समजून घ्या, पेगासस म्हणजे काय? त्याच्या चर्चेत येण्याचे नवे कारण काय आहे? हे स्पायवेअर कसे काम करते? आणि यापूर्वी पेगाससबद्दल काय-काय वाद आहेत…

सध्या का चर्चेत आहे पेगासस?

पॅरिसमधील एक संस्था फोर्बिडन स्टोरीज आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशनल यांच्याकडे जवळपास 50 हजार फोन नंबरची यादी आहे. या संस्थांचा असा दावा आहे की, या संख्या पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून हॅक करण्यात आल्या आहेत. या दोन्ही संस्थांनी ही यादी जगभरातील 16 मीडिया संस्थांशी शेअर केली आहे. आठवड्याच्या तपासानंतर हे उघड झाले आहे की, विविध देशांचे सरकार पत्रकार, विरोधी पक्षनेते, व्यापारी, समाजसेवक, वकील आणि वैज्ञानिक अशा अनेक लोकांची हेरगिरी करत आहेत. या यादीत भारताचे नावही आहे. ‘द वायर’ या न्यूज पोर्टलच्या वृत्तानुसार हेरगिरी केलेल्या लोकांमध्ये 300 भारतीय लोकांची नावे समाविष्ट आहेत. इस्रायली कंपनीने बनवलेले स्पायवेअर पेगासस हेरगिरीसाठी वापरले गेले आहे.

पेगासस नेमकं काय आहे?

पेगासस एक स्पायवेअर आहे. स्पायवेअर म्हणजे हेरगिरी किंवा पाळत ठेवण्यासाठी वापरलेले सॉफ्टवेअर. याद्वारे कोणताही फोन हॅक होऊ शकतो. हॅकिंगनंतर त्या फोनचा कॅमेरा, माइक, मेसेजेस आणि कॉल यासह सर्व माहिती हॅकरकडे जाते. हे स्पायवेअर इस्रायली कंपनी एनएसओ ग्रुपने बनवले आहे. या यादीमध्ये कोणाची नावे समाविष्ट आहेत? या यादीमध्ये 40 पत्रकार, विरोधी पक्षातील तीन प्रमुख नेते, घटनात्मक पद असलेली एक व्यक्ती, मोदी सरकारचे दोन मंत्री आणि सुरक्षा यंत्रणांचे विद्यमान व माजी प्रमुख यांच्यासह अनेक व्यापारी यांचा समावेश आहे. हे पत्रकार हिंदुस्तान टाइम्स, इंडियन एक्स्प्रेस, टीव्ही-18, द हिंदू, द ट्रिब्यून, द वायर यासारख्या संस्थांशी संबंधित आहेत. त्यात अनेक स्वतंत्र पत्रकारांची नावेही आहेत.

यापूर्वी पेगासस कधी चर्चेत होते?

पेगासस पहिल्यांदा चर्चेत आले ते 2016 मध्ये. यूएईचे मानवाधिकार कार्यकर्ते अहमद मन्सूर यांना अज्ञात क्रमांकावरून अनेक एसएमएस आले होते, ज्यात अनेक लिंक पाठविण्यात आल्या होत्या. जेव्हा अहमद यांना या संदेशांबद्दल शंका आली तेव्हा त्यांनी हे संदेश सायबर तज्ज्ञांकडून तपासले. तपासात असे समोर आले आहे की, जर अहमद यांनी संदेशात पाठवलेल्या लिंकवर क्लिक केले असते तर पेगासस त्यांच्या फोनमध्ये डाउनलोड झाला असता. 2 ऑक्टोबर 2018 रोजी सौदी अरेबियन पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाच्या चौकशीत पेगाससचे नावही समोर आले. जमाल खाशोगी यांच्या हत्येपूर्वी हेरगिरी केली जात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला होता. 2019 मध्येही पेगासस चर्चेत होता. मग व्हॉट्सअॅपने म्हटले की, पेगाससच्या माध्यमातून सुमारे 1400 पत्रकार आणि मानवी हक्क कार्यकर्त्यांची व्हॉट्सअ‍ॅप माहिती त्यांच्या फोनवरून हॅक केली गेली. कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी राज्यसभेत हा विषय जोरदारपणे उपस्थित केला होता आणि सरकारवर अनेक आरोप केले होते. याशिवाय हे स्पायवेअर बेकायदेशीरपणे वापरल्याचा आरोपही मेक्सिकन सरकारवर करण्यात आला आहे.

या सर्व आरोपांवर भारत सरकारने काय म्हटलं?

या संपूर्ण प्रकरणावर इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. भारतीय वेळेनुसार रात्री जवळजवळ साडेनऊ वाजता बातमी आली होती. याच्या लगेच नंतर केंद्र सरकारने या प्रकरणावर उत्तर दिले आहे. भारत सरकारने फोन हॅकिंगचे आरोप आणि याच्याशी संबंधित वृत्ताचे खंडन केले, सोबतच या रिपोर्टला भारतीय लोकशाहीची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्नही म्हटले आहे.

भारत सरकारने आपल्या जबाबात म्हटले आहे की, ‘भारतासारख्या लोकशाहीमध्ये प्रायव्हसी एक मूलभूत अधिकार आहे. अशा वेळी जी रिपोर्ट समोर आली आहे, ती पूर्णपणे चुकीची आहे. रिपोर्ट त्यांच्या सोयीनुसार तयार करण्यात आली आहे, यात तपास अधिकारी- न्यायाधीश सर्वकाही तेच आहेत. सरकारने संसदेतही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे की, अशा कोणत्याही प्रकारच्या घडामोडीत भारत सरकार संलिप्त नाही.’

सॉफ्टवेअर बनवणारी कंपनी काय म्हणाली?

Pegasus स्पायवेयर एक असे सॉफ्टवेयर आहे जे व्हाट्सअप सारख्या अॅपसह फोनमधील इतर अॅप्लिकेशन्सना हॅक करू शकते. हे सॉफ्टवेअर इस्रायली कंपनी NSO Group द्वारे डेव्हलप करण्यात आले आहे. या वृत्त समोर आल्यानंतर NSO ग्रुपने आपले स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीच्या मते, मीडिया रिपोर्ट्समध्ये जे काही आरोप करण्यात आले आहेत, ज्या मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहेत.

NSO ग्रुपने म्हटले की, ते या रिपोर्टला छापणाऱ्यांच्या विरोधात मानहानीची केस दाखल करण्याच्या तयारीत आहेत. कारण ज्या सूत्रांच्या आधारे हे वृत्त छापण्यात आले आहे, त्यावरून असे वाटते की, त्यांनी पूर्णपणे कपोलकल्पित माहिती दिली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ते फक्त ठराविक देशांच्या कायदेशीर एजन्सीजना ही सुविधा उपलब्ध करतात, ज्यांचा उद्देश एखाद्याचा जीव वाचवणे असतो.

पेगासस काम कसे करते?

सायबर सिक्युरिटी रिसर्च ग्रुप सिटीझन लॅबच्या म्हणण्यानुसार, हॅकर्स डिव्हाइसवर पेगासस इन्स्टॉल करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात. एक मार्ग म्हणजे एखाद्या डिव्हाइसवर संदेशाद्वारे ‘एक्सप्लॉइट लिंक’ पाठवणे. युजरने या लिंकवर क्लिक करताच फोनवर पेगासस आपोआप इन्स्टॉल होते. 2019 मध्ये जेव्हा पेगासस व्हाट्सएपच्या माध्यमातून डिव्हाइसवर इन्स्टॉल करण्यात आले, तेव्हा हॅकर्सनी एक वेगळी पद्धत अवलंबली होती. त्यावेळी हॅकर्सनी व्हॉट्सअ‍ॅपच्या व्हिडिओ कॉल फीचरमधील बगचा फायदा घेतला. बनावट व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटद्वारे हॅकर्सनी टारगेटेड फोनवर व्हिडिओ कॉल केले. यादरम्यान कोडच्या साहाय्याने पेगासस फोनमध्ये इन्स्टॉल करण्यात आले.

हॅक झाल्यावर पेगाससकडे तुमची कोणती माहिती जाते?

एकदा आपल्या फोनवर इन्स्टॉल झाल्यावर पेगाससला हॅकर कमांड आणि कंट्रोल सर्व्हरद्वारे सूचना दिली जाऊ शकते. तुमचे पासवर्ड, संपर्क क्रमांक, स्थान, कॉल आणि संदेशदेखील रेकॉर्ड केले जाऊ शकतात आणि कंट्रोल सर्व्हरकडे हे पाठविले जाऊ शकतात. पेगासस आपोआप आपल्या फोनचा कॅमेरा आणि माइक चालू करू शकतो. तुमचे खरे लोकेशन आणि वेळदेखील हॅकरला माहिती असते. याशिवाय हॅकरकडे तुमचे ई-मेल, एसएमएस, नेटवर्क तपशील, डिव्हाइस सेटिंग्ज, ब्राउझिंग हिस्टरीची माहितीही असते. म्हणजेच एकदा जर पेगासस तुमच्या डिव्हाइसवर इन्स्टॉल झाले तर तुमची सर्व माहिती हॅकरसाठी उपलब्ध होऊन जाते.

पेगासस एवढे प्रसिद्ध का आहे?

एकदा इन्स्टॉल झाल्यानंतर पेगासस फोनवर कोणतेही ट्रेस सोडत नाही. म्हणजेच आपला फोन हॅक झाल्याचे आपल्याला कळणारही नाही. पेगासस कमी बँडविड्थवरही काम करू शकते. यामुळे फोनची बॅटरी, मेमरी आणि डेटादेखील कमी वापरला जातो, यामुळे फोन हॅक झाल्याबाबत कुणाला शंकासुद्धा येत नाही. अँड्रॉइडपेक्षा अधिक सुरक्षित समजल्या जाणार्‍या आयफोनच्या आयओएसलाही याद्वारे हॅक करता येऊ शकतो. एखाद्याचा फोन जर लॉक केलेला असेल, तरीही पेगासस आपले काम बिनदिक्कतपणे करत राहते.

सामान्य माणसाने घाबरण्याची गरज आहे का?

दरम्यान, Pegasus हे खूप महागडे सॉफ्टवेअर आहे. याची किंमत लाखो डॉलर आहे. कंपनीने म्हटले की, फक्त सरकारलाच ते सॉफ्टवेअर विकतात. Pegasusचा वापर इस्तेमाल मोठ्या प्रमाणावर होऊ शकत नाही. यामुळे सर्वसामान्य माणसाने याला घाबरण्याची अजिबात गरज नाही.

हे एक अल्टिमेट सर्विलान्स टूल आहे. जर कोणत्याही सरकारला एखाद्यावर नजर ठेवायची आहे, तर ते Pegasusकडे जाऊ शकतात. हे खूप स्मार्ट आणि अॅडव्हान्स सर्व्हिलान्स सॉफ्टवेअर आहे. जर याचा संपर्क कमांड अँड कंट्रोल सर्व्हरशी 60 दिवसांपर्यंत झाला नाही, तर याला वाटते की हे चुकीच्या डिव्हाइसवर इन्स्टॉल झाले आहे, आणि मग हे स्वत:ला आपोआप नष्टही करून घेते.

Know Everything About Pegasus Spyware, How it Works in Marathi

महत्त्वाच्या बातम्या