देशातले ४० कोटी लोक कोरोनाविरूध्दच्या लढाईत “बाहुबली” बनलेत; पंतप्रधानांचे गमतीशीर वक्तव्य

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीलाच एक गमतीशीर वक्तव्य करून संसदेत हलके फुलके वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले, की देशातले ४० कोटी कोरोनाविरुध्दच्या लढाईत आता बाहुबली बनलेत. कारण कोरोनाची लस बाहूमध्ये म्हणजे दंडावर देण्यात येते.400 million people in the country became “Bahubali” in the war against Corona; Funny statement of the Prime Minister

बाहूमध्ये लस घेऊन ४० कोटी लोक बाहुबली बनलेत, असे विधान त्यांनी संसदेच्या दरवाजात पत्रकारांशी बोलताना त्यांनी केले. कोरोनाने सगळे जग वेढले आहे. भारताने त्याविरोधात प्रभावी उपाययोजना केली आहे. त्यामुळे संसदेत या विषयावर अर्थपूर्ण होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.



कोरोनावरच्या चर्चेला सरकार प्राधान्य देईल. सर्व खासदारांचे सरकार ऐकून घेईल. ज्या उणिवा राहिल्या असतील, त्या सुधारून पुढे जाण्याची सरकारची इच्छा आहे. संसदेतल्या पक्षनेत्यांनी आज सायंकाळी जरूर वेळ काढावा. मी त्यांना सगळी माहिती सांगेन. त्याची चर्चा देखील संसदेच्या दोन्ही सदनात करण्याची सरकारची तयारी आहे, असे मोदी म्हणाले.

विरोधकांनी सरकारला जास्तीत जास्त टोकदार प्रश्न जरूर विचारावेत. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी सरकार तयार आहे. त्यांचा एकही प्रश्न सरकार अनुत्तरीत ठेवणार नाही. पण विरोधकांनी संसदीय नियमांचे पालन करून शिस्त पाळून सरकारी उत्तरे ऐकून घेतली पाहिजेत, असे आवाहन मोदींनी विरोधकांना केले.

400 million people in the country became “Bahubali” in the war against Corona; Funny statement of the Prime Minister