मोदींमुळे विनाकारण दु;खी असणाऱ्यांवर शत्रुघ्न सिन्हा यांची शॉटगन, पंतप्रधानांचे केले कौतुक


ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत मोदींमुळे विनाकारण दु:खी असणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. काही लोक मोदींमुळे विनाकारण दु:खी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.Shatrughan Sinha’s shotgun on those who are unjustifiably saddened by Modi, praises PM


विशेष प्रतिनिधी

पाटणा : ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत मोदींमुळे विनाकारण दु:खी असणाºयांवर निशाणा साधला आहे. काही लोक मोदींमुळे विनाकारण दु:खी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी भारतीय जनता पक्षावर टीका करत कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ते सातत्याने मोदी सरकारवर टीकाही करत असतात. परंतु, त्यांनी एक ट्विट करून मोदी यांचे अप्रत्यक्षपणे कौतुक केले आहे.



शत्रुघ्न सिन्हा  यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,  जगात चार प्रकारची माणसं दुखी आहेत. १. आपल्या दु:खांमुळे दु:खी. २. दुसऱ्यांच्या दु:खांमुळे दु:खी.  दुसºयांच्या सुखामुळे दु:खी आणि ४. विनाकारण मोदींमुळे दु:खी!तब्बल तीन दशकांहून अधिक काळ  शत्रुघ्न सिन्हा हे भारतीय जनता पक्षामध्ये होते.

पाटना साहिब मतदारसंघातून त्यांनी खासदारकीची निवडणूकहीि जिंकली होती.  अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रात त्यांनी मंत्रिपदही भूषवलं होतं. मात्र, भाजपमध्ये मोदीयुग सुरू झाल्यानंतर ते राजकीयदृष्ट्या अडगळीत पडले होते. त्यामुळे ते सातत्याने मोदी सरकारविरुध्द वक्तव्ये करत असत. विरोधकांच्या व्यासपीठांवरही हजेरी लावत होते.

अखेर २०१९ मध्ये त्यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यानंतर झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकांत कॉँग्रेसने सपाटून मार खाल्ला. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा भाजपाचे दरवाजे ठोठवायला सुरूवात केल्याचे बोलले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ट्विट करून मोदी यांच्यावर विनाकारण टीका करणाऱ्यांवर निशाणा साधल्याचे म्हटले जात आहे.

Shatrughan Sinha’s shotgun on those who are unjustifiably saddened by Modi, praises PM

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात