नाशिक : हरलेल्यांचे लोढणे गळ्यात बांधून घ्यायला काँग्रेसचा नकार; ममता आणि पवार यांना बाहेरच ठेवणार!!, हेच राजकीय चित्र काँग्रेसचे संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या आजच्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यातून बाहेर आले.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसच्या सर्व प्रदेशाध्यक्षांची आणि सरचिटणीसांची बैठक घेतली. वेणुगोपाल यांनी त्या बैठकीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेवर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातल्या एकीकरणाच्या विषयाचे सावट होते. बहुतांश पत्रकारांनी याच मुद्द्यावर वेणुगोपाल यांना प्रश्न विचारले. वेणूगोपाल यांनी त्या प्रश्नांची उत्तरे थेट नकारात्मक देऊन टाकली. ममता बॅनर्जी या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना भेटले असल्या, तरी त्यांच्या भेटीत काँग्रेस आणि तृणमूळ काँग्रेस यांच्यातल्या विलीणीकरणाची बिलकुल चर्चा झाली नाही. चर्चा झाली, ती इंडी आघाडी मजबूत करण्याची झाली. बाकी विलीनीकरणाचा विषय केवळ अफवा आहेत, असे वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले.
– संजय राऊतांच्या तोंडून पवारांनी सोडले पिल्लू
पण ज्यावेळी काँग्रेस आणि तृणमूळ काँग्रेस यांच्या एकत्रित करण्याचा विषय सुरू झाला, त्याचवेळी संजय राऊत यांच्या तोंडून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस मूळ काँग्रेसमध्ये विलीन करायच्या विषयाचे पिल्लू सोडले. शरद पवारांनी पुढाकार घेऊन देशातल्या सर्व काँग्रेस मूळ काँग्रेसमध्ये विलीन करावे आणि काँग्रेसचा मुख्य प्रवाह मजबूत करावा, अशी सूचना संजय राऊत यांनी काल आणि आज अशा दोन्ही दिवशी केली. या सूचनेवर शरद पवार स्वतः काही बोलले नाहीत किंवा कालच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात सुद्धा कुठले भाष्य केले नाही. पण संजय राऊत यांच्या तोंडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या एकत्रीकणाचा विषय मात्र काढायचे ते राहिले नाहीत.
– काँग्रेसला नाही इच्छा
याच राजकीय पार्श्वभूमीवर के. सी. वेणुगोपाल यांनी ममता बॅनर्जींची तृणमूळ काँग्रेस मूळ काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या मुद्द्याला नकार दिला. याचा अर्थच ममता बॅनर्जींच्या हरलेल्या तृणामूळ काँग्रेसचे लोढणे काँग्रेसला स्वतःच्या गळ्यात बांधून घ्यायची इच्छा नाही हेच त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले. कारण पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी हरल्या असल्या, तरी त्या काँग्रेस विरुद्ध निवडणूक लढल्या होत्या. तिथे त्यांनी काँग्रेस बरोबर निवडणूक पूर्व आघाडी करायला सुद्धा नकार दिला होता. ममता बॅनर्जींना पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेसची राजकीय सावली सुद्धा नको होती. पण त्या बंगालची निवडणूक हरल्याबरोबर “जाग्यावर” आल्या आणि त्यांना मूळ काँग्रेस आपलीशी वाटायला लागली. म्हणूनच त्यांच्या समर्थकांनी तृणमूळ काँग्रेस आणि मूळ काँग्रेस या एकत्र येतील अशा बातम्यांच्या पुड्या सोडल्या. पण त्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी हाणून पाडल्या.
– केरळमध्ये काँग्रेस विजयी
एकीकडे ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल मध्ये हरल्या असल्या तरी केरळ सारख्या राज्यात काँग्रेसने पुन्हा सत्ता मिळाली ही सत्ता स्वबळावर मिळवली. मग भले काँग्रेसला त्यासाठी मुस्लिम लीगशी जुळवून घ्यावे लागले असेल, पण काँग्रेसने मुस्लिम लीगशी जुळवून घेऊन केरळमध्ये सत्ता आणून आपला “पॉलिटिकल फुटप्रिंट” वाढविला. त्यामुळे काँग्रेसला “पॉलिटिकली अप्परहँड” मिळाला. म्हणूनच काँग्रेसने ममता बॅनर्जींच्या भरलेल्या पूर्ण मूळ काँग्रेसचे लोंढे गळ्यात बांधून घ्यायला नकार दिला.
– पवारांना हिंग लावून सुद्धा नाही विचारले
शरद पवारांनी संजय राऊत यांच्या तोंडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची पिल्लू सोडले असले, तरी काँग्रेसच्या नेत्यांनी राऊतांच्या सूचनेला हिंग लावून सुद्धा विचारले नाही. पक्षाच्या केंद्रीय पातळीवर त्या विषयाची चर्चा सुद्धा झाली नाही. याचा अर्थच काँग्रेसने निदान ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसच्या विषयावर नकारात्मक उत्तर तरी दिले, पण शरद पवारांच्या सूचनेला त्यांनी हिंग लावून सुद्धा विचारले नाही. कारण काही झाले तरी ममता बॅनर्जी सलग १५ वर्षे मुख्यमंत्री राहिल्यात आणि त्यांचे राजकारण बरेचसे विश्वासार्ह आहे. त्यांचा एखाद्याला विरोध आणि त्यांनी एखाद्याची बाजू घेणे यात प्रामाणिकता आहे. शरद पवारांचे मात्र बिलकुल तसे नाही. पवारांचे राजकारण विश्वासार्ह नाही. ते काँग्रेसच्या गोटात राहून भाजपच्या गोटातल्या नेत्यांना हवी असलेली कामगिरी करतात. ते ज्या गोटात असतात, तोच गोट पोखरत राहतात. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी काँग्रेस पोखरली. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसची उभारणी केली. पवारांचे हे “काड्याघालू” राजकारण काँग्रेसचे केंद्रीय नेते बिलकुल विसरलेले नाहीत. म्हणूनच पवारांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सूचनांना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी हिंग लावून सुद्धा विचारले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App