राफेल विमानांचा वेगवान विक्रम, १२ तासांत कापले १७ हजार किलोमीटरचे अंतर


भारताच्या ताफ्यात दाखल झालेल्या राफेल विमानांनी आपली शक्ती दाखवून दिली आहे. अत्याधुनिक लढाऊ विमानांपैकी एक असलेल्या राफेल विमानांनी एक वेगळा विक्रम रचला आहे. फ्रान्सच्या या लढाऊ विमानांनी एकाच उड्डाणात पॅसिफिक महासागरात असलेले एअरबेस गाठले. यासाठी राफेल लढाऊ विमानांनी १२ तासांत १७ हजार किमीचे अंतर कापले. आतापर्यंत कोणत्याही राफेल विमानाने एकाच उड्डाणात एवढे अंतर कापले नाही. याआधी फ्रान्सहून भारतात दाखल झालेल्या राफेल विमानांनी ६७०० किमीचे अंतर कापले होते.Rafel aircraft’s fastest record, covering a distance of 17,000 kilometers in 12 hours


विशेष प्रतिनिधी

पॅरिस: भारताच्या ताफ्यात दाखल झालेल्या राफेल विमानांनी आपली शक्ती दाखवून दिली आहे. अत्याधुनिक लढाऊ विमानांपैकी एक असलेल्या राफेल विमानांनी एक वेगळा विक्रम रचला आहे. फ्रान्सच्या या लढाऊ विमानांनी एकाच उड्डाणात पॅसिफिक महासागरात असलेले एअरबेस गाठले.

यासाठी राफेल लढाऊ विमानांनी १२ तासांत १७ हजार किमीचे अंतर कापले. आतापर्यंत कोणत्याही राफेल विमानाने एकाच उड्डाणात एवढे अंतर कापले नाही. याआधी फ्रान्सहून भारतात दाखल झालेल्या राफेल विमानांनी ६७०० किमीचे अंतर कापले होते.



फ्रान्स हवाई दलाच्या एअर टू एअर रिफ्यूलिंग आॅपरेटर मेजर पियरिक यांनी सांगितले की, एकाच उड्डाणात १७ हजार किमीचे अंतर गाठणारा युरोपमधील फ्रान्स पहिलाच देश आहे. राफेल विमानांनी कॅलिफोर्नियामधून उड्डाण घेऊन दक्षिण पॅसिफिक महासागरातील फ्रान्सचे हवाई तळ गाठले. या दरम्यान राफेल विमानात हवेतच सात वेळेस इंधन भरण्यात आले.

फ्रान्सच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ताहिती येथे जाण्यासाठी तीन राफेल लढाऊ विमानांसह फ्रान्स हवाई दलाच्या सात विमानांनी उड्डाण घेतले होते. पहिल्या उड्डाणात त्यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील एअरबेस गाठले. त्यानंतर तेथून दुसऱ्या उड्डाणात त्यांनी हा विक्रम केला.

राफेल लढाऊ विमानांद्वारे फ्रान्स हिंदी-पॅसिफिक महासागर क्षेत्रामध्ये शक्तिप्रदर्शन करत आहे. फ्रान्सचे इतर देशांमध्येही लष्करी तळ आहेत. पॅसिफिक महासागर भागात फ्रान्सने ताहिती येथे तळ उभारला आहे. हिंदी महासागर क्षेत्रात फ्रान्सकडे रियूनियन आयलँड आणि जिबूती सारखे महत्त्वाची ठिकाणे आहे.

Rafel aircraft’s fastest record, covering a distance of 17,000 kilometers in 12 hours

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात