समाजवादी पक्षाकडे 400 उमेदवारच नाहीत ते काय 400 जागा जिंकणार!!; बसपच्या सतीश मिश्रा यांचे टीकास्त्र


वृत्तसंस्था

लखनऊ : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने 400 जागा जिंकण्याचा दावा केला असला तरी त्यांच्याकडे मुळात 400 उमेदवारच नाहीत ते काय 400 जागा जिंकणार!!, अशा शब्दात बहुजन समाज पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मायावती यांचे प्रमुख सल्लागार सतीश चंद्र मिश्रा यांनी टीकास्त्र सोडले आहे. Samajwadi Party does not have 400 candidates, will it win 400 seats !!; Tikastra of BSP’s Satish Mishra

उत्तर प्रदेशात भाजप किंवा समाजवादी पक्ष सत्तेवर येणार नाहीत तर मायावती यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज पक्ष पुन्हा पूर्ण बहुमताने सत्तेवर येईल, असा दावा त्यांनी केला आहे. राज्याच्या लढाईत काँग्रेस पक्ष राजकीय दृष्टी अस्तित्वातच नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलणार?, असा खोचक सवाल मिश्रा यांनी केला आहे. मात्र त्याच वेळी एक विसंगत विधान त्यांनी केले आहे. मायावती किंवा आपण स्वतः विधानसभेची निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.



एकीकडे बहुजन समाज पक्षाचे हे दोन्ही टॉपचे नेते विधानसभेची निवडणूक लढवत नाहीत. परंतु तरीही सतीश चंद्र मिश्रा यांनी बहुजन समाज पक्ष पूर्ण बहुमताने सत्तेवर येण्याचा दावा केला आहे.

Samajwadi Party does not have 400 candidates, will it win 400 seats !!; Tikastra of BSP’s Satish Mishra

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात