UP Assembly Elections : प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वातच काँग्रेस लढणार उत्तर प्रदेश निवडणूक, मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबतही त्याच निर्णय घेणार – सलमान खुर्शीद

Congress will be fighting the upcoming UP Assembly elections under the leadership of Priyanka Gandhi Vadra says Salman Khurshid

UP Assembly elections : काँग्रेस प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुका लढणार आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबतही त्याच निर्णय घेतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर ही उत्तरे दिली. Congress will be fighting the upcoming Assembly elections under the leadership of Priyanka Gandhi Vadra says Salman Khurshid


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : काँग्रेस प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुका लढणार आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबतही त्याच निर्णय घेतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर ही उत्तरे दिली.

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूक प्रियांका गांधी वाड्रा यांच्या नेतृत्वाखाली लढू. आमचा विजय सुनिश्चित करण्यासाठी त्या खूप मेहनत घेत आहेत. ते म्हणाले की, फक्त प्रियांका गांधी वाड्राच मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याची घोषणा करू शकतात.

दुसरीकडे, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन पक्ष संघटनेच्या वारंवार बैठका घेत असलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा दोन दिवसांच्या दौऱ्यावर रविवारी रायबरेलीला पोहोचल्या. त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. राज्य सरकारवर हल्ला चढवत प्रियांका म्हणाल्या की, त्यांना ना लोकांचे प्रश्न समजतात, ना त्यांची काही चिंता आहे, हे फक्त खोट्या जाहिराती आणि हवेत दावे करणारे सरकार आहे.

Congress will be fighting the upcoming UP Assembly elections under the leadership of Priyanka Gandhi Vadra says Salman Khurshid

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण