अर्शद मदनींकडून मोहन भागवतांच्या वक्तव्याचे समर्थन, हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच, आरएसएस प्रमुख चुकीचे बोलले नाहीत, संघ आता योग्य मार्गावर

Arshad Madani Said DNA Of Hindus And Muslims Is Same, RSS Chief Did Not Say Anything Wrong

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच म्हटले की, हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते आणि प्रत्येक भारतीय ‘हिंदू’ आहे. जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अर्शद मदनी यांनी मोहन भागवतांच्या या विधानाचे समर्थन केले आहे. अर्शद मदानी म्हणाले की, आरएसएस योग्य मार्गावर आहे. Arshad Madani Said DNA Of Hindus And Muslims Is Same, RSS Chief Did Not Say Anything Wrong


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच म्हटले की, हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते आणि प्रत्येक भारतीय ‘हिंदू’ आहे. जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अर्शद मदनी यांनी मोहन भागवतांच्या या विधानाचे समर्थन केले आहे. अर्शद मदानी म्हणाले की, आरएसएस योग्य मार्गावर आहे.

‘दैनिक भास्कर‘ या वृत्त संकेतस्थळाशी मुलाखतीदरम्यान अर्शद मदानी म्हणाले, “ते काय चुकीचे बोलले? भारतात राहणारे गुर्जर, जाट, राजपूत हे हिंदू तसेच मुस्लिम आहेत. हे खूप चांगले आहे. मी त्यांचे कौतुक करतो. मला वाटते की आरएसएसचा जुना दृष्टिकोन आता बदलत आहे आणि ते योग्य मार्गावर आहेत.

अर्शद मदनी पुढे म्हणाले, ‘मुस्लिमांना त्यांच्या देशावर प्रेम आहे. दहशतवादाची जी प्रकरणे पकडली जातात, ती बहुतांश खोटी असतात. कारण जर हे सर्व खरे असतील तर कनिष्ठ न्यायालयाकडून शिक्षा मिळाल्यानंतर लोक उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयातून निर्दोष कसे सुटतात? अशी अनेक प्रकरणे माझ्यापुढे आली आहेत, जिथे कनिष्ठ न्यायालय आणि उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयाने या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली आहे.

काय म्हणाले होते सरसंघचालक?

पुण्यात ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाउंडेशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मोहन भागवत म्हणाले की, ‘समंजस’ मुस्लिम नेत्यांनी अतिरेक्यांच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. ते म्हणाले, ‘हिंदू शब्द मातृभूमी, पूर्वज आणि भारतीय संस्कृतीच्या बरोबरीचा आहे. इतर मतांचा तो अनादर नाही. आपल्याला मुस्लिम वर्चस्वाबद्दल नाही तर भारतीय वर्चस्वाबद्दल विचार करावा लागेल.

आरएसएस प्रमुख म्हणाले की, महासत्ता म्हणून भारत कोणालाही धमकावणार नाही. ‘राष्ट्र प्रथम आणि राष्ट्र सर्वोच्च’ या परिसंवादात ते म्हणाले, “हिंदू शब्द हा आपल्या मातृभूमी, पूर्वज आणि संस्कृतीच्या समृद्ध वारशाच्या बरोबरीचा आहे. प्रत्येक भारतीय हिंदू आहे. हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते.”

Arshad Madani Said DNA Of Hindus And Muslims Is Same, RSS Chief Did Not Say Anything Wrong

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात