प्रशांत किशोर यांच्या संभाव्य कॉंग्रेस प्रवेशाला वीरप्पा मोईली यांचा जाहीर पाठिंबा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या कॉंग्रेस पक्षातील प्रवेशाला ज्यांचा विरोध आहे ते सुधारणाविरोधी आहेत असे मत कॉंग्रेसच्या जी-२३ गटातील ज्येष्ठ बंडखोर नेते मोईली यांनी व्यक्त केले आहे. प्रशांत किशोर यांचा पक्षात समावेश करण्यासही त्यांनी भरभरून पाठिंबा जाहीर केला.Moily backs entry of Prashant kishore in Congress

गेल्या वर्षी सोनिया यांना संघटनात्मक फेरबदलासाठी पत्र लिहिलेल्या २३ वरिष्ठ नेत्यांमध्ये मोईली यांचा समावेश होता. काही नेत्यांनी जी-२३ गटाची दिशाभूल केल्याचा आरोप करून वरिष्ठ नेते एम. वीरप्पा मोईली यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षात सुधारणा आधीपासूनच सुरु असल्याचे सांगितले.



ते म्हणाले, प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा आणि प्रत्यक्ष पक्षात आंतरिक सुधारणा कराव्यात, ज्यामुळे खूप फायदा होईल. सोनिया आणि राहुल यांचा सुधारणेचाच उद्देश आहे. प्रशांत किशोर हे रणनीती आखण्यात यशस्वी ठरल्याचे सिद्ध झाले आहे.

काँग्रेसच्या पुनरागमनासाठी आवश्यक असलेल्या पुनरागमनासाठी ते योजना आणि आराखडा आखू शकतात. संघटनेत चैतन्य निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असून त्यासाठी सोनिया गांधी यांनी मोठ्या `शस्त्रक्रिये‘चा विचार यापूर्वीच केला आहे.

Moily backs entry of Prashant kishore in Congress

महत्त्वाच्या बातम्या.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात