लोकांचे प्रेम आहे तोपर्यंत माझी हकालपट्टी होणार नाही, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचा विश्वास


विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : लोकांचे माझ्यावर प्रेम आहे तोपर्यंत माझी हकालपट्टी होणार नाही, असे गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी म्हटले आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी नितीन पटेल यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, त्यांनी भूपेंद्र पटेल यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.As long as people love me, I will not be evicted, believes Gujarat Deputy Chief Minister Nitin Patel

भारतीय जनता पक्षाने गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांची घोषणा केल्यानंतर मेहसाणा येथील एका कार्यक्रमात बोलताना पटेल यांनी विजय रूपाणी यांच्या उत्तराधिकाºयाचे अभिनंदन केले. आपले नाव मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर होते या वृत्ताचाही त्यांनी इनकार केला. ते म्हणाले, जोपर्यंत लोकांचे प्रेम मिळत आहे, तोपर्यंत माझी हकालपट्टी होणार नाही.



२०१६ मध्ये आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हाही नितीन पटेल यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर होते. परंतु, त्यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अमित शहा यांनी विजय रुपाणी यांना मुख्यमंत्री होण्याची संधी दिली. २०१७ मध्ये रूपाणी यांची पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली तेव्हा नितीन पटेल यांनी खातेवाटपावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यांना दिलेल्या खात्यांची जबाबदारी घेण्यास नकार दिला होता.

पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने हस्तक्षेप करत त्यांना अर्थमंत्रीपद दिल्यावर त्यांनी कार्यभार स्वीकारला. त्यामुळे आताही मुख्यमंत्रीपद मिळाले नसल्याने ते नाराज असल्याच्या अटकली बांधल्या जात होत्या.

याबाबत बोलताना नितीन पटेल म्हणाले,नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे आमच्यातीलच असून माझे मित्र आहेत. आम्ही पूर्वी एकत्र काम केले आहे. पक्षाने त्यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे. कोणाला आमच्याबद्दल काहीही म्हणू द्या पण मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पक्षाच्या पातळीवर होते. माध्यमांचे काम हे फक्त अंदाज बांधणे असते.

पटेल म्हणाले, माझी हकालपट्टी होणार अशा बातम्या मी आता पाहिल्या. परंतु, मला हे सांगायचे आहे की जोपर्यंत मी जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या हृदयात आहे तोपर्यंत मला कोणीही बाहेर काढू शकत नाही. मी बराच काळ विरोधी पक्षात काम केले आहे आणि 30 वर्षे पक्षासाठी काम केले आडष्यपटेल मुख्यमंत्री होण्याच्या कयासांबद्दल पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले, मी आधीच सांगितले आहे की माध्यमांना अंदाज लावण्याचा अधिकार आहे.

पण निर्णय नेहमीच पक्ष घेतो. मला हे सांगताना आनंद होत आहे की घाटलोडिया मतदारसंघातील माझे मित्र आणि शेजारी भूपेंद्र पटेल यांची नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. राष्ट्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली नवीन मंत्रिमंडळ तयार होणार असल्याने मी त्यावर टिप्पणी करू शकत नाही.

As long as people love me, I will not be evicted, believes Gujarat Deputy Chief Minister Nitin Patel

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात