वृत्तसंस्था
भिवंडी : भिवंडीत वाहतूक पोलिसांनीच रस्त्यावर पडलेले खड्डे भरले आहेत. गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकीतून त्यांनी हा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. दुसरीकडे रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याची मागणी करून कृतीहीन आंदोलन करणाऱ्यांना ही मोठी चपराक आहे. Bhiwandi traffic police fill potholes, Activities out of social commitment; A big slap in the face to the agitators only
पावसाळ्यात मार्गावर हमखास खड्डे पडतात. त्यावरून राजकारण होते. सर्वच पक्षातील प्रतिनिधी आणि संघटना खड्ड्यांवरून राजकारण करतात. पण, कृती कोणीच करत आहे. पण, भिवंडीच्या वाहतूक विभागाने स्वतःच पुढाकार घेऊन खड्डे भरले आहेत.
भिवंडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मायने म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते विकास महामंडळ एमएमआरडीए तसेच रस्त्या संदर्भात असलेल्या विभागांना पत्रव्यवहार करून गणपतीपूर्वी खड्डे बुजवण्याचे लेखी पत्र दिले होते. मात्र, त्यावर सर्वच शासकीय यंत्रणांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत वाहतूक पोलिसांनी भिवंडीत खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे.
मुंबई नाशिक महामार्ग तसेच ठाणे ते भिवंडी, कशेळी ते अंजुर फाटा व मानकोली ते चिंचोटी-कामन रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. अपघात आणि नुकसान होत आहे. त्याला वाहतूक पोलिसांना जबाबदार ठरविले जातात. त्यामुळे प्रशासनाला वारंवार विनंती करूनही रस्त्यांवरील खड्डे बुजवत नसल्याने वाहतूक पोलिसांना खड्डे बुजवण्याची वेळ आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App