भूपेंद्र पटेल यांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते गुजरातचे मुख्यमंत्री; घाटलोडियाचे आमदार म्हणून विक्रमी मतांनी विजयी


वृत्तसंस्था

अहमदाबाद : भूपेंद्रभाई पटेल हे एक भारतीय राजकारणी असून भारतीय जनता पक्षाचे सदस्य आणि गुजरातचे नूतन मुख्यमंत्री बनणार आहेत. नगरसेवक ते मुख्यमंत्री, असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. Bhupendra Patel’s political journey from corporator to Chief Minister of Gujarat; Ghatlodia won by record votes as MLA

विजय रूपाणी यांना गुजरातचे मुख्यमंत्री बनविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. २०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शशिकांत पटेल यांच्याविरुद्ध विजय मिळवून ते घाटलोडिया मतदारसंघाचे आमदार झाले.त्यांनी १,१७,००० मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला. या निवडणुकीत गुजरातमधील कोणत्याही मतदारसंघात कोणत्याही भाजप उमेदवाराला एवढी मोठी मते मिळाली नव्हती.विशेष म्हणजे, मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना पदावरून हटविले तेव्हा त्यांनी त्यांना पाठींबा दिला होता. तसेच याच मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी आग्रह धरला होता. भूपेंद्र पटेल यांनी शशिकांत पटेल यांचा विक्रमी मतांनी पराभव केला.

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ते अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे अध्यक्षही होते. भूपेंद्र पटेल यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे.

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पटेल हे १९९९-२००१ दरम्यान अहमदाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते, तर २००८-२०१० दरम्यान ते अहमदाबाद म्युनिसिपल स्कूल बोर्डाचे उपाध्यक्ष होते. २०१० ते २०१५ पर्यंत ते अहमदाबादच्या थालतेज प्रभागातून नगरसेवक होते. गुजरातमध्ये पाटीदार समाज मोठा आहे. या समाजाचे ते नेते आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या यशात या समाजाची भूमिका महत्वाची असल्याने आणि निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची निवड मुख्यमंत्रिपदासाठी झाली आहे.

Bhupendra Patel’s political journey from corporator to Chief Minister of Gujarat; Ghatlodia won by record votes as MLA

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण