WATCH : गोटखिंडी मस्जिद गणपतीची चाळीस वर्षांपासूनची परंपरा सांगली जिल्ह्यात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक


वृत्तसंस्था

सांगली : सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील मस्जिदमध्ये गणपतीची मूर्ती बसवून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा चाळीस वर्षांपासून सुरु आहे.ही परंपरा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे.
वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावात हिंदू- मुस्लिम बंधू एकत्र येऊन मस्जिदमध्ये गणपती बसवत आहेत.Gotkhindi Masjid of Ganapati A tradition of forty years

न्यू गणेश तरुण मंडळाने, १९८१ मध्ये पहिल्यांदा गणपती बसवण्यास सुरु केले. मात्र, त्यावेळी पाऊस आल्याने मुर्तीची प्रतिष्ठापना मस्जिदमध्ये केली. तेव्हापासून हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येत मस्जिदमध्ये गणपती बसवत आहेत.



गणेश चतुर्थी आणि मोहरम आला तर मस्जिदमध्येच गणपती आणि मोहरम एकत्र साजरा करतात. गणेशोत्सवामध्ये मुस्लिम बांधव मांसाहार करत नाहीत. यामुळे या गावात खऱ्या अर्थाने दोन्ही समाजामध्ये ऐक्याचे दर्शन घडत आहे.कोरोनाचा काळ असल्याने सर्व नियमांचे पालन करून अत्यंत साधेपणाने श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

  • गोटखिंडी मस्जिदमध्ये गणेशोत्सवाची परंपरा
  • सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात उत्सव
  •  चाळीस वर्षांपासून मस्जिदमध्ये गणपती बसवतात
  •  हिंदू- मुस्लिम ऐक्याचे घडते दर्शन
  • गणेशोत्सवामध्ये मुस्लिम बांधव मांसाहार करत नाहीत
  •  गणेश चतुर्थी आणि मोहरम सुद्धा मस्जिदमध्ये एकत्र

Gotkhindi Masjid of Ganapati A tradition of forty years

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात